बसस्थानक आहे का.....सिनेमा थिएटर...! कुणीपण या आणि पोस्टर चिकटवून जा....! कोऱ्हाळे बु येथील बस स्थानकाला जाहिरातींचा विळखा

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम------
कोऱ्हाळे बुद्रुक - प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे बुद्रुक येथे एसटी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी उभारलेल्या बस स्थानकाला खाजगी जाहिरातींचा विळखा बसला असून प्रवाश्यांना या जाहिरातबाजी चा मोठा त्रास होत आहे.
          निरा बारामती हा एसटी महामंडळाला सर्वाधिक उत्पन्न देणारा मार्ग आहे. या मार्गावरून अनेक प्रवासी येजा करण्यासाठी एसटी बसचा वापर करत असतात. त्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून गावोगावी बस स्थानक उभारले आहेत. मात्र कोऱ्हाळे बुद्रुक येथील बस स्थानकावर खाजगी जाहिरातदारांनी आपल्या व्यवसायांचे फ्लेक्स लावले आहेत. मोठ मोठ्या बॅनर मुळे बस स्थानकाचे प्रवेश द्वार बंद झाले असून प्रवाशांना बस स्थानकात जाता येत नाही. या गावाहून सोमेश्वर शैक्षणिक संकुलात जाणारे अनेक विद्यार्थी आहेत. मात्र बस स्थानकावर बॅनर् लावल्याने त्यांना बस स्थानकाचा वापर करता येत नाही. यामुळे विद्यार्थ्यांना ऊन पावसात अक्षरशः रस्त्यावर उभे राहावे लागते. यामध्ये विद्यार्थिनींची मोठी कुचंबणा होत आहे. फ्लेक्स लावणाऱ्यांना बोलणारे कुणी नसल्याने बस स्थानकाचा श्वास कोंडला असून या ठिकाणचे फ्लेक्स काढावीत अशी मागणी पालक करत आहेत.
.....------------
चैतन्य चव्हाण, विद्यार्थी
मी सोमेश्वर नगर येथील महाविद्यालयात शिकत आहे. मी दररोज एसटी बसने ये जा करतो. मात्र बस स्थानकावर फ्लेक्स लागल्याने आम्हाला नाईलाजाने रस्त्यावरच थांबावे लागते.
..........
अमोल गोंजारी, आगर प्रमुख बारामती आगार
महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या परवानगीशिवाय हे बॅनर लागले आहेत त्यामुळे संबंधितांना तात्काळ हे बॅनर काढण्याबाबत कडक सूचना देणार आहोत..
To Top