बारामती ! 'वाणेवाडी'च्या सायलीची दिल्लीत दंगल : राजस्थानच्या कुस्तीपट्टूला चितपट करत पटकावले ब्राँझ पदक

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
१७ वर्षाखालील फेडरेशन कप नॅशनल चॅम्पियन कुस्ती स्पर्धा दिल्ली येथे खेळल्या जात आहेत . काल दि. २१ सप्टेंबर रोजी वाणेवाडी च्या सायली  नारायण जगताप हिने ४६ किलो वजन गटात तिसरा नंबर प्राप्त करत ब्रॉंझ पदक मिळवले . 
            सायली हिने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना काल चार सामने खेळले . कर्नाटक व दिल्ली येथील कुस्तीपटू ना गुणांवर मात देत व राजस्थानच्या कुस्तीपटू ला चितपट करत तीन कुस्त्या जिंकत सेमिफायनल ला प्रवेश केला . हरियाणा च्या कुस्तीपटू सोबत चुरशीच्या सामन्यात १०-८ असा दोन गुणांच्या फरकाने पराभव झाल्याने अंतिम सामन्यात खेळण्याची तिची संधी हुकली . ब्रॉंझ पदक प्राप्त केल्याने वाणेवाडी व सोमेश्वर परिसरात आनंद व्यक्त होत असून एकता तालीम चे प्रशिक्षक संग्राम डोंबाळे हे सायली जगताप सोबत दिल्ली येथे  गेलेले असून त्यांनी दिल्ली त्यांनी सोमेश्वर रिपोर्टर च्या प्रतिनिधी शी संवाद साधत वरील माहिती दिली आहे. 
To Top