सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
सामाजिक बांधिलकी जपत भोर तालुक्यातील दुर्गम - डोंगरी भागात ज्ञानदानाचे अविरत कार्य करून नवनवीन उपक्रम राबवीत विद्यार्थ्यांना घडवणारे तसेच भविष्यातील आदर्श नागरिक घडविण्याचे कार्य करणारा समाजातील महत्त्वाचा घटक शिक्षक होय असे प्रतिपादन रोटरी क्लब भोर-रायगडच्या अध्यक्षा सुवर्णा मळेकर यांनी केले
रोटरी क्लब भोर - राजगडच्या वतीने सोमवार दि.१२ शिक्षक दिनाच्या पार्शवभूमीवर भोर तालुक्यातील गुणवंत शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आला यावेळी मळेकर बोलत होत्या. यावेळी विठ्ठल अंकुश मळेकर जि. प.शाळा मळे -सुतारवाडी, सुनील बोडके(माध्यमिक विद्यालय खानापूर),सुनील दिनकर वीर (संगमनेर हायस्कूल), गणेश अशोक बोरसे (जिल्हा परिषद शाळा म्हाळवडी) ,शौकतअली शेख (समर्थ माध्यमिक विद्यालय वेळवंड) , शहाजी लगड (ए.टी कॉलेज भोर) तसेच रोटरी क्लब परिवारातील सेवानिवृत्त शिक्षक बाळासाहेब नवले,नारायण वाघ यांना सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आले.तसेच रोलर स्केटिंग खेळामध्ये प्राविण्य मिळवल्याबद्दल श्लोक पराग भेलके याला ट्रॉफी आणि सन्मानपत्र देऊन सन्मानीतव केले.करण्यात आला. यावेळी सुरेखाताई भेलके , रोटरी क्लब सचिव डॉ. रूपाली मेत्रे, जयश्री शिंदे, प्रोजेक्ट डायरेक्टर विनय कुलकर्णी,रोटेरियन चारुशीला निकम, डॉ.आनंदा कंक, डॉ. संजय मेत्रे, संपत मळेकर, मेघा आगटे ,डॉ. योगेंद्र आगटे,रमेश बुदगुडे, लक्ष्मण पारठे, राजश्री शेटे ,एड. कोंढाळकर उपस्थित होते.