निधन वार्ता ! वाई ! पसरणी येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते यादव शिर्के यांचे निधन

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम------
वाई : प्रतिनिधी
पसरणी (ता. वाई) येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व सहकार क्षेत्रातील अनुभवी तज्ञ यादव अनंता शिर्के यांचे वयाच्या ८० व्या वर्षी वृध्दापकाळाने निधन झाले.
   त्यांच्या पश्चात पत्नी, विवाहित ३ मुली, १ मुलगा, सुन, नातवंडे असा परिवार आहे. वाई तालुका सचिव संघटनेचे अध्यक्ष संतोष शिर्के यांचे ते वडील होत.
    पसरणी विकाससेवा सोसायटीचे संस्थापक सचीव म्हणुन तसेच चिखली, फुलेनगर या गावांमधील विकास सेवा सोसायट्यांमध्ये त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. मनमिळाऊ स्वभाव व धार्मिक प्रवृत्तीमुळे ते पंचक्रोशित प्रसिद्ध होते. 
   त्यांच्यावर कृष्णा तीरी पसरणी येथे मान्यवरांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी जगन्नाथ मुळीक, पोलीस पाटील संदीप प्रभाळे युवानेते स्वप्नील गायकवाड, संजय मांढरे, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पसरणी शाखेचे प्रमुख आप्पा शिंगटे यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.
To Top