कौतुकास्पद ! गुणवरेच्या कन्येची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अंडर १९ मुलीच्या संघात निवड

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम------
फलटण : प्रतिनिधी
गुणवरे ता. फलटण येथील व रायगड एल. सी. बी. चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांची कन्या  सानिया दयानंद गावडे हिची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अंडर १९ मुलीच्या संघात निवड करण्यात आली आहे.
        गुणवरे सोसायटीचे माजी चेअरमन सदाशेठ गावडे यांची नात व गुणवरे गावच्या माजी सरपंच  प्रविणाताई दयानंद गावडे यांच्या त्या कन्या आहेत. कुमारी सानिया हिची महाराष्ट्र संघात निवड झाल्याने गुणवरे गावच्या शिरपेचात मानाचा तुरा मिळाला आहे. अधिकाऱ्यांचे गाव म्हणून नावलौकिक असलेल्या गुणवरे गावची कन्या आत्ता खेळात महाराष्ट्र सह देशात नावलौकिक करणार आहे.
 सानिया हि पुणे येथे पुणे क्रिकेट क्लब, डेक्कन जिमखाना येथे क्रिकेट चा सराव करते. हैदराबाद, पुणे, कोल्हापूर, बारामती आदी ठिकाणी झालेल्या क्रिकेट सामन्यात तिने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. सानिया हि ओपनर बॅट्समन सह उत्कृष्ट किपर आहे. ऑलराऊंडर खेळाडू म्हणून तिची निवड झाली आहे.
             महाराष्ट्र चे मा. राज्यमंत्री दत्तात्रय भरणे व पत्रकार दत्ता माळशिकारे साडूबंधू यांची ती कन्या आहे.
To Top