बारामती ! निंबुत परिसरात पंधरा जनावरांना लंपीची लागण : मात्र उपचार केल्यास हा आजार बरा होणारा : डॉ. पोळ

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
प्रतिनिधी : विजय लकडे
निबुंत, गडदरवाडी आणि खंडोबाचीवाडी परिसरात जनावरांना झालेल्या लंपी आजारावर ९० टक्के लसीकरण  पुर्ण झाले असून १५ जनावरांना या आजाराची लागण झाली आहे. त्यातही आठ जनावरे बरी झाली असून एका जनावराचा मृत्यू झाला आहे. औषधोउपचार केल्यास हा आजार बरा होणारा असल्याने शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन निंबुत पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. पोळ यांनी केले आहे. 
           शासकीय पातळीवर ११९१ जनावरांचे लसीकरण केले असून खाजगीत ४५० जनावरांचे लसीकरण झाले आहे. १५ जनावरांना लागण झालेल्या जनावरांचा मृत्युदर १ ते ५ टक्केचा आहे. त्यामुळे राहिलेल्या पशु मालकांना जनावरांना लसीकरण करून घेण्याचे आवाहन डॉ पोळ यांनी केले आहे.
To Top