बारामती ! 'माळेगाव' कारखान्यापेक्षा 'सोमेश्वर' कारखान्याचे टनाला ३१ रुपये जादाच : पुरुषोत्तम जगताप

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वरनगर(ता.बारामती): श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने मागील गाळप हंगामात एकुण १३ लाख २५ हजार ३९५ मे. टन ऊसाचे गाळप केले असुन यातुन बीव्हीसह सरासरी ११.९९ टक्केचा साखर उतारा राखत १५ लाख ५४ हजार ६२५ साखर पोत्यांचे उत्पादन घेतले आहे. या संपुर्ण गाळप केलेल्या १३ लाख २५ हजार ३९५ मे. टन ऊसास सोमेश्वरने प्रति मे.टन रु.३०२०/- प्रमाणे दर जाहिर केला असुन दुसरीकडे शेजारील माळेगाव साखर कारखान्याने प्रतिटन ३,१००/ रु. प्रमाणे ऊसदर दिला असल्याचे जाहिर केले असुन मात्र यामध्ये आपल्या श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने प्रत्यक्षात माळेगाव साखर कारखान्यापेक्षा ३१ रुपये प्रतिटन जास्तीचे सभासदांना दिले असल्याची माहिती श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष श्री. पुरुषोत्तम जगताप यांनी दिली.

श्री. जगताप यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हंटले आहे की, आपल्या श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने गाळप केलेल्या संपुर्ण १३ लाख २५ हजार ३९५ मे.टन ऊसास एकसारखाच रु.३०२०/- प्रमाणे ऊसदर आपण जाहिर केला आहे तर दुसरीकडे माळेगाव सहकारी साखर कारखान्याने ३ वेगवेगळे ऊसाचे भाव शेतकर्यांना जाहिर केलेले आहेत. यामध्ये माळेगावने सभासदांचा गाळप केलेल्या ८ लाख ३१ हजार १७४ मे. टन ऊसास प्रति मे.टन ३१००/- रुपये प्रमाणे ऊसदर जाहिर केला आहे तसेच कार्यक्षेत्रातील बिगर सभासद गाळप केलेल्या शेतकर्यांच्या ३१ हजार २६७ मे. टन ऊसास प्रति मे.टन ३०००/- रुपये प्रमाणे ऊसदर जाहिर केला आहे त्याचबरोबर कार्यक्षेत्राबाहेरील बिगर सभासद गाळप केलेल्या ६ लाख ६४ हजार ४७५ मे. टन ऊसास प्रति मे.टन २,८५०/- रुपये प्रमाणे ऊसदर जाहिर केला आहे. म्हणजेच माळेगावने जाहिर केलेल्या या ३ वेगवेगळ्या ऊसदाराची सरासरी काढली तर प्रति मे.टन माळेगावने २९८९/- रुपये प्रमाणे शेतकर्यांना ऊसदर जाहिर केला आहे तर दुसरीकडे आपल्याच सोमेश्वरने संपुर्ण गाळप केलेल्या ऊसास प्रति मे.टन ३०२० /- रुपये प्रमाणे ऊसदर जाहिर केलाआहे. त्यामुळे सोमेश्वरने माळेगावपेक्षा जास्तीचे ३१/- रुपये प्रति मे.टन जादा जाहिर केले असल्याचे श्री. जगताप म्हणाले.

श्री.जगताप पुढे म्हणाले की, आपल्या सोमेश्वरची गाळप हंगाम संपण्यापुर्वी प्रतिदीन सरासरी गाळप क्षमता ५००० मे.टन होती तर माळेगावची प्रतिदीन सरासरी गाळप क्षमता ७५०० मे.टन होती तसेच आपली डिस्टीलरी ३० केएलपीडीची असुन माळेगावची डिस्टीलरी क्षमता आपल्यापेक्षा दुप्पट ६० केएलपीडी आहे तसेच आपला को जनरेशन १८ मेगावॅट क्षमतेचा असुन माळेगावचा को जनरेशन ३५ मेगावॅट क्षमतेचा आहे. म्हणजेच माळेगावपेक्षा कमी क्षमतेचा आपला कारखाना असतानाही गतहंगामात आपण सर्वच प्रकल्पातून उत्तम कामगिरी राखत वेळोवेळी राज्याचे विरोधी पक्षनेते आदरणीय अजितदादा पवारसो यांचे बहुमोल मार्गदर्शन व सहकार्य घेत सभासदांना चांगला ऊसदर जाहिर करु शकलो याचा आनंद आहे असे श्री. जगताप म्हणाले.

श्री.जगताप पुढे म्हणाले की, दोन वर्षानंतर आपल्या कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवार दि.२९/०९/२०२२ रोजी दुपारी १ वाजता कारखाना कार्यस्थळावर आयोजित केली असुन नेहमीप्रमाणे आपले सर्व सभासद खेळीमेळीच्या वातावरणात सभा पार पाडण्यासाठी सहकार्य करतील असा मला विश्वास आहे.
To Top