बारामती ! राजकीय सोयीसाठी हा कार्यक्रम ! माळेगावला दहा गावे जोडल्यास न्यायालयात जाणार : दिलीप खैरे

Admin
2 minute read
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी 
माळेगाव कारखान्याला सोमेश्वर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील जिरायती भागातील दहा गावे जोडण्याचा मुद्यावर न्यायालयात जाणार. सभासदांना विश्वासात न घेता राजकीय सोयीसाठी हा कार्यक्रम सुरू आहे. दीड हजार सभासदांचा प्रश्न आहे. कारखान्याचे विस्तारीकरण  करताना कुठलीच गाव वजा नाही केली मंग ही दुर्बुद्धी आताच का ? असा सवाल करून वेळप्रसंगी आंदोलन करण्याचा इशारा भाजप नेते तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा. सभापती दिलीप खैरे यांनी दिला आहे. 
               दिलीप खैरे 'सोमेश्वर रिपोर्टर'शी बोलत होते. सोमेश्वर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात निम्म्यापेक्षा अधिक जिराईत क्षेत्र आहे. बारामतीचे बहुतांश जिराईत क्षेत्राची नाळ स्थापनेपासून 'सोमेश्वर'शी जोडलेली आहे. यामधील 'माळेगाव'चा अंतराच्या दृष्टीने जवळ असलेली अंजनगाव, जळगाव क. प., जळगाव सुपे, देऊळगाव, कारखेल, भिलारवाडी, नारोळी, कोरोळी, काऱ्हाटी, खराडेवाडी ही दहा महसुली गावांकडे डोळा वळला आहे. सोमेश्वरचे दीड हजार सभासद  असलेल्या या दहा गावांतून एकाही सभासदाने अथवा गावच्या नागरिकांनी कार्यक्षेत्र हस्तांतराची मागणी साखरआयुक्तांकडे अथवा सोमेश्वरकडे केलेली नाही.
To Top