बारामती ! 'सोमेश्वर'च्या संचालकांचे दबावाखाली संस्थेच्या हिताच्या विरोधी काम : दिलीप खैरे

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वर कारखाना स्वतःच्या कार्यक्षेत्रातील दहा महसुली गावे माळेगाव कारखान्याला जोडण्याचा कट करत असून संचालक मंडळ कोणाच्यातरी दबावाखाली संस्थेच्या होताविरुद्ध काम करत असल्याचा आरोप भाजपचे नेते तथा पुणे जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा. सभापती दिलीप खैरे यांनी केला आहे. 
        याबाबत दिलीप खैरे यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हंटले आहे की, आपल्या कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवार दिनांक २९/०९/२०२२ रोजी कारखाना कार्यस्थळावर होत असून सदर सभेस मी आजारी असल्याने उपस्थित राहू शकत नाही, यास्तव याची नोंद घ्यावी सोबतच आपल्या कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा होत असताना सदर सभेपुढे असणाऱ्या वार्षिक सभेची विषय पत्रिका पाहता संचालक मंडळ इतक्या महत्त्वाच्या विषयात एक तर गंभीर नाहीत किंवा कोणाच्या तरी दबावा खाली हस्तक म्हणून संस्थेच्या हित विरोधी काम करू पाहत आहे. एका बाजूला केवळ राजकीय तडजोडी पोटी विस्तारवाढ विलंबाने झाल्याने सभासदांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले आहे. या पार्श्वभूमीवर विस्तारवाढ पूर्ण झाली आहे. कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील नवीन अनेक शेतकरी सभासद करून घावे म्हणून पाठपुरावा करत आहेत त्याच वेळी विस्तारिकरण होत असताना स्वानिधी साठी शेअर भागाची किमंत आणि संख्या वाढ अपेक्षित असल्याचे संचालक मंडळ म्हणते आणि त्यावेळी कारखान्याची रखडलेली विस्तारवाढ पूर्ण होत असून या गाळप हंगामात त्याचा अपेक्षित उपयोग होत असतानाच आपण संस्थेच्या स्थापनेपासून सभासद असलेल्या सभासदांना विश्वासात न घेता पुरवणी एजेंटा काढून गावे हस्तांतरणाचा विषय घेतला आहे. ही बाब गंभीर असून वास्तविक विस्तारवाढ वेळेवर न केल्याने संस्थेचे पर्यायाने सभासदांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे. शिवाय जी गावे आपण हस्तांतरणा साठी निवडली आहेत त्या गावांमधील सभासद संख्या उपलब्ध ऊस उत्पादन पाहता सदरची बाब ही केवळ राजकीय हेतूने प्रेरित होऊन करीत आहात असे वाटते. खरे तर आपण संस्थेच्या आणि सभासदांच्या हितासाठी काम करणे अपेक्षित असताना केवळ राजकीय नेते यांच्या साठी काम करीत आहात असे वाटते म्हणून या विषयाला आपण मागे घ्यावे ही विनंती असे न करता आपण या विषयास सभे पुढे मंजुरीला सादर करणार असल्यास संस्थेच्या आणि भागातील सभासदांच्या न्याय हक्कासाठी या पुरवणी विषयाला माझा विरोध नोंदवण्यात यावा. याबाबत कायदेशीर प्रक्रिया करण्यास भाग पाडू नये ही विनंती.
To Top