सोमेश्वर रिपोर्टर टीम---
वाई : दौलतराव पिसाळ
वेळे येथे एसटीच्या धडकेत नारायण नामदेव जगताप हे जागीच ठार झाले .ते अलिबाग येथुन आईच्या भरणी श्राद्धा साठो गावी जाण्या साठी ते आले होते .महा मार्ग ओलंडताना हा भिषण अपघात झाला .हा अपघात रात्री ७ वाजण्याच्या सुमारास झाला आहे .
घटना स्थळावरुन मिळालेली माहिती अशी की
नारायण नामदेव जगताप वय ५५ राहणार रणदुल्लाबाद ता.कोरेगाव जिल्हा सातारा हे अलिबाग जिल्हा रायगड येथे नोकरीला होते दि.१४ संप्टेबर रोजी आईचे भरणी श्राद्ध रणदुल्लाबाद या मुळ गावी असल्याने ते वेळे ता.वाई गावच्या हद्दीत असणार्या पुणे सातारा महामार्गावर ऊतरले होते आणी तेथुन पुढे रणदुल्लाबाद येथे जाण्यास बसची सोय नसल्याने त्यांनी नातेवाईकांना गाडी घेऊन बोलवले होते .नातेवाईक येई पर्यंत ते सातारा पुणे महामार्ग ओलांडुन हॉटेल विशाल मध्ये चहा पिण्या साठी गेले होते .चहा घेऊन ते पुन्हा सातारा पुणे महामार्ग ओलांडुन पुणे सातारा महामार्ग ओलंडताना भरघाव वेगात जाणार्या नाशिक वडूज या एसटी बसने त्यांना जोराची धडक दिली.
या भिषण अपघाताची माहिती भुईंज पोलिस ठाण्याचे सपोनि आशिष कांबळे यांना समजताच त्यांनी तातडीने सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक व्हि.एस.अवघडे.हवलदार चंद्रकांत मुंगसे कॉस्टेबल राजेश कांबळे या पोलिस पथकाला अपघात स्थळावर पाठवले .हे पथक अपघात स्थळावर दाखल होऊन त्यांनी मृत नारायण नामदेव जगताप वय ५५ राहणार रणदुल्लाबाद ता कोरेगाव यांचा
मृतदेह ताब्यात घेऊन त्याचा पंचनामा करून तो शवविच्छेदना साठी कवठे ता.वाई येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविला .आणी नाशिक वडूज ही एसटी व चालक संतोष रत्नाकर गरवारे वय ५० राहणार हिंगणे ता.खटाव याला ताब्यात घेऊन भुईंज पोलिस ठाण्यात आणुन त्याच्या वर गुन्हा दाखल केला आहे . वेळे येथील सातारा पुणे आणी पुणे सातारा या महामार्गावर रस्तेविकास महामंडळाने गेल्या कित्येक वर्षांपासून मंजूर असलेला ऊड्यान पुल ऊभा न केल्याने व भुयारी मार्गाचे बांधकाम न केल्याने येथे अपघातांची मालिका सुरू असल्याने अनेकांना आपले प्राण गमवावे लागले असलेच्या नोंदी भुईंज पोलिस ठाण्यात आढळून येतात.