सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
निरा डावा कालावा कॅनॉल बचाओ संघर्ष समिती व जलसंपदा विभागाचे अधिकारी यांची दि.१६ रोजी बारामती येथे बैठक होणार असल्याची माहिती
शेतकरी कृती समितीचे नेते सतिश काकडे यांनी दिली.
जलसंपदा विभागाकडुन निरा डावा कालव्याच्या दुरूस्तीचे काम करण्यात येणार असुन ते काम सध्या निरा पाटबंधारे व सोमेश्वर पंचकोशीमध्ये सुरू झालेले आहे. सदर कामामध्ये कॅनॉलमध्ये तळासहीत प्लॅस्टीक कागद टाकुन अस्तरीकरण करण्यात येणार असुन त्यानुसार पाटबंधार विभागाने सर्व तयारी केली सदर कामाचे टेंडर झालेले असुन ठेकेदारांकडुन लवकरच काम सुरू होणार आहे अशी माहिती समजली. त्यामुळे शेतकरी कृती समितीच्या वतीने कॅनॉलच्या अस्तरीकरणाचे काम तात्काळ बंद करून ते रद्द होण्यासाठी अधिक्षक अभियंता पुणे पाटबंधारे मंडळ, सिंचन भवन पुणे, कार्यकारी अभियंता पुणे पाटबंधारे विभाग पुणे व उपविभागीय अधिकारी निरा पाटबंधारे उपविभाग निरा यांना लेखी निवेदन देण्यात आलेले होते.
त्यास अनुसरून शेतकरी कृती समितीस दि. २९/८/२०२२ रोजी कॅनॉल अस्तरीकरणा बाबत जलसंपदा विभागाने माझ्या पत्रांच्या मुद्दयांबाबत असमाधानकारक माहिती दिली. त्या अनुषंगाने कृती समितीच्या वतीने आंदोलनाची दिशा कायम असल्याने जलसंपदा विभागाचे राजेंद्र धोडपकर कार्यकारी अभियंता पुणे पाटबंधारे विभाग पुणे यांनी शुक्रवार दि.१६/९/२०२२ रोजी दुपारी १२.०० वाजता पाटबंधारे विभाग विश्रामगृह बारामती येथे कॅनॉल बचाओ संघर्ष समिती व जलसंपदा विभाग यांची जाहिर मिटींग आयोजित केलेली आहे. तरी असारीकरण न होता बाबत जागरूक शेतकऱ्यांनी आपली बाजू भक्कम पणे मांडण्यासाठी राजकिय जोडे बाजुला ठेवुन अस्तरीकरणास विरोध करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शेतकरी कृती समिती व कॅनॉल बचाओ संघर्ष समितीच्या वतीने सतिशराव काकडे यांनी केलेले आहे.