सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
मोढवे ता बारामती येथील उद्योजक दीपक साखरे यांच्या मालकीचे एस एस एस स्टोन क्रशवरील एका चालकाने गेली दीड वर्षापासून डीझेलची चोरी केल्या प्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत आकाश संजय साळवे वय 27 वर्षे धंदा-नोकरी , रा. करंजेपुल ता बारामती जि.पुणे यांनी फिर्यात दाखल केली होती. यावरून यावरून तुळशीराम शिवराम शिळमकर रा.पाडेगांव ता. खंडाळा जि. सातारा याच्यावर वडगाव निंबाळकर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
सविस्तर हकीकत एस.एस.एस. स्टोन क्रशर मोडवे ता बारामती जि पुणे येथे कंपनीतील ट्रीपर वर गेले 18महिन्यापासुन ड्रायव्हर म्हणुन काम करीत आहेत 26/8/2022 रोजी यातील आरोपीत मजकुर याचे ताब्यातील टिपर नं. एम.एच 42 ए.क्यू 9349 याचे डिझेल टाकीवर हाताने चिखल लावल्याचे दिसले तसेच डिझेल टाकीचे सैन्सर लॉक नटबोल्ट खोललेले दिसले व ते चुकिचे पध्दतीने बसवलेले दिसलेने फिर्यादीस आरोपीने डिझेल चोरी केलेचे संशय आलेने त्यांचेकडे विचारपुस करता आरोपीने सदर टिपर मधील 5 लिटर डिझेल वाल्हे येथे एका जीपने ड्रायव्हरला विक्री केल्याचे सांगितले अशा प्रकारे यातील आरोपीने ड्रायव्हर म्हणुन कामावर असताना दि. 3/4/2021 ते 27/8/2022 सकाऴी 08.00 वा पर्यंत कंपनीतील टिपर मधील अंदाजे 60.000/- रुपये किमतीचे डिझेल यापुर्वी बरेच वेळा चोरी केल्याचे कबुल व मान्य केले आहे.सदर आरोपी याने अजुन ही डिजेल चोरी केल्याचा संशय आहे.म्हणून माझी तुळशीराम शिवराम शिळमकर रा.पाडेगांव ता. खंडाळा जि. सातारा याचेविरुध्द फिर्याद आहे.