सोमेश्वर रिपोर्टर टीम------
वाई : प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाने राज्यात तंबाखूजन्य पदार्थ व गुटखा विक्रीस बंदी केलेली असून सातारा जिल्हयात
बेकायदेशीररित्या गुटखा विक्री करणारे लोकांच्यावर कारवाई करणे बाबत श्री अजयकुमार बन्सल, पोलीस
अधीक्षक सातारा यांनी सुचना दिलेल्या आहेत.
दिनांक ०२/०९/२०२२ रोजी श्री. बाळासाहेब भरणे, पोलीस निरीक्षक, वाई पो.स्टे. हे पोलीस ठाण्यात
हजर असताना अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती वंदना रुपनवर व श्री. रोहन शहा हे पोलस ठाण्यात आले व त्यांनी माहीती सांगितली की, त्यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, डाक बंगलारोड, मे. साई किराणा स्टोअर्स सिध्दनाथवाडी, वाई ता. वाई जि. सातारा येथे एका इसमाने त्याने दुकानात चोरटी विक्री करण्या करीता गुटखा आणून ठेवलेला आहे. त्यानंतर त्यांनी सदरची माहीती गुन्हे प्रकटीकरण विभाग वाईच्या कर्मचा-यांना देवून त्यांना अन्न सुरक्षा अधिका-यांचे सोबत छापा कारवाई कारवाई करण्याचे सुचना दिल्या.
त्यानूसार मे. साई किराणा स्टोअर्स
सिध्दनाथवाडी, वाई ता. वाई जि. सातारा येथे छापा टाकला असता सदर इसमाचे दुकानात कि.रु.१,४५,६००/-
रुपये किंमतीचा विमल पान मसाला, वि १ तंबाखू, आर. एम. डी. पानमसाला व ए १ तंबाखू मिळून आली आहे.
सदरचा गुटखा ताब्यात घेवून अन्न सुरक्षा अधिकारी, सातारा अन्न सुरक्षा अधिकारी यांनी वाई पोलीस स्टेशन
येथे येवून संमंधीत इसमाचे विरोधात गुन्हा नोंद केलेला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास विजय शिर्के, सहा.पोलीस फौजदार हे करीत असून आरोपीस अटक करण्यात आलेली आहे.
सदरची कारवाई श्री. अजयकुमार बन्सल, पोलीस अधीक्षक सातारा, श्री. अजित बो-हाडे अपर पोलीस
अधीक्षक सातारा, श्रीमती शितल जान्हवे खराडे उप विभागीय पोलीस अधिकारी, वाई विभाग वाई यांच्या
मार्गदर्शनाखाली श्री. बाळासाहेब भरणे, पोलीस निरीक्षक वाई पोलीस स्टेशन अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती
वंदना रुपनवर व श्री. रोहन शहा, गुन्हे प्रकटीकरण विभागाचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजय शिर्के,
महीला पोलीस नाईक सोनाली माने, पो. कॉ. अमित गोळे, प्रसाद दुदुस्कर. श्रावण राठोड केलेली आहे.