सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
बारामती : प्रतिनिधी
बारामती तालुका व शहर राष्ट्रवादी शिक्षक सेलच्या वतीने दरवर्षी आदर्श पुरस्कारांचे वितरण ५ सप्टेंबर ' शिक्षक दिनानिमित्त'केले जाते चालू वर्षीच्या पुरस्कारांचे वितरण सोमवार दिनांक ५ सप्टेंबर २०२२ रोजी राष्ट्रवादी भवन कसबा- बारामती येथे बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष संभाजी नाना होळकर यांच्या अध्यक्षतेखाली व बारामती तालुका पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी संपतराव गावडे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे. कार्यक्रमाची वेळ दु.3:00 वा.असून संबंधित शाळांचे संस्थापक ,प्राचार्य, मुख्याध्यापक शिक्षक व पुरस्कार प्राप्त शिक्षकांच्या कुटुंबीयांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिक्षक सेल च्या वतीने करण्यात आले आहे.
मुख्याध्यापक गटात ३ शिक्षक गटात ७ व शिक्षकेतरांमधून २ एकूण १२ व्यक्तींना सदर कार्यक्रमात गौरविण्यात येणार असल्याची माहिती बारामती शहर राष्ट्रवादी शिक्षक सेलचे अध्यक्ष श्री अविनाश सावंत सर व बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिक्षक सेलचे अध्यक्ष श्री नागनाथ ठेंगल यांनी दिली आहे.
--------------
बारामती तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिक्षक सेल आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त (सन 2022 )मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर यादी
मुख्याध्यापक
1) श्री कांबळे संजय निवृत्ती
न्यू इंग्लिश स्कूल ,वाणेवाडी
2) श्रीमती जाधव वैशाली बापूराव
श्री.शहाजी हायस्कूल ,सुपे
3) श्री इनामदार शब्बीर जाफरभाई
न्यू इंग्लिश स्कूल,वाकी - चोपडज (पांढरवस्ती)
शिक्षक
4) श्री.जाधव सुजितकुमार मोहन
श्री छत्रपती शाहू हायस्कूल, बारामती
5) डॉ.दरेकर गेनू रामकिसन
मु.सा.काकडे महाविद्यालय, सोमेश्वरनगर
6) श्री.धापटे हनुमंत लक्ष्मण
श्रीमती हौसाबाई पां.घोरपडे विद्यालय, पिंपळी
7) डॉ.कांबळे मिलिंद रोहिदास
विद्या प्रतिष्ठानचे कला, विज्ञान,वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय,विद्यानगरी- बारामती
8) श्री.काळे बाबासाहेब लक्ष्मण
न्यू इंग्लिश स्कूल,लाटे- खलाटेवस्ती
9)श्रीमती.वसेकर कांतिका वसंत
आनंद विद्यालय,होळ
10) डॉ.पाटील हनुमंतराव साहेबराव
विद्या प्रतिष्ठानचे कला, विज्ञान, वाणिज्य वरिष्ठ महाविद्यालय, विद्यानगरी- बारामती
शिक्षकेतर
11) श्री.तांबे विश्वास जगन्नाथ, वरीष्ठ लिपीक,
शारदाबाई पवार विद्यानिकेतन, शारदानगर
12) श्री.सोरटे हरिदास रघुनाथ, चतुर्थ श्रेणी कर्मचारी,
माध्यमिक विद्यालय सोरटेवाडी . सर्व गुणवंत मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा .............
श्री ठेंगल एन. डी. अध्यक्ष बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेल श्री अविनाश सावंत अध्यक्ष बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेल.