सोमेश्वर रिपोर्टर टीम------
अंजनगाव - हेमंत गडकरी
अंजनगाव येथील सोमेश्वर विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी ओपन जिमचे उद्घाटन नुकतेच पार पडले.
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब परकाळे यांच्या हस्ते हे उद्घाटन पार पडले. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक दादासाहेब मोरे, अंजन गावचे उपसरपंच सुभाष वायसे, नवनाथ परकाळे, मुख्याध्यापक अनिल साळुंके, क्रीडा शिक्षक संदीप जमदाडे उपस्थित होते.
क्रीडा संचालनालय पुणे व तालुका क्रीडा अधिकारी बारामती यांच्या वतीने हे साहित्य पुरविण्यात आले. यावेळी बोलताना बाळासाहेब परकाळे म्हणाले की विरोधी पक्ष नेते अजित दादा पवार यांच्या मुळे हे जिम चे साहित्य मिळाले असून विद्यार्थ्यांनी नियमितपणे व्यायाम करून आपली शरीर निरोगी व सुदृढ बनवावे. मुलांसोबत मुलींनीही नियमितपणे व्यायाम करावा. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अभ्यासाबरोबरच व्यायाम ही महत्त्वाचा असल्याचे त्यांनी नमूद केले.