सोमेश्वर रिपोर्टर टीम------
वाई : प्रतिनिधी
संस्थेचा ४४ वा वर्धापन दिन वाई शाखेत उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. शितल जानवे - खराडे, निवासी नायब तहसिलदार. वैशाली जायगुडे-घोरपडे यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात साजरा झाला.
यावेळी संचालिका छाया शिंदे, विदयावर्धिनी संस्थेचे अध्यक्ष श्री दिलीप चव्हाण, उपाध्यक्ष दत्ता मर्ढेकर, विश्वस्त प्रा. दत्तात्रय वाघचवरे, प्राथमिक शिक्षक बॅकेचे अध्यक्ष विठठ्ल माने, यांच्या हस्ते उपस्थितीत होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दिपप्रज्वलन व श्रीफळ वाढवुन शुभारंभ करण्यात आला.
डॉ. शितल जानवे-खराडे यांनी बचतीचे महत्व व विश्वासाचे नाते या विषयी माहिती सांगितली, वाई विभागातील लोकांची बोध्दिक पातळी उच्च आहे. तसेच जिल्हयात अनेक नामवंत लोकांनी सहकाराची चळवळ यशस्वी उभी केली. त्याचा सर्वसामान्याना लाभ होत आहे. ही कौतुकाची बाब होय संस्थेने पाच हजार कोटींची उलाढाल केल्याने संस्थेचे पदधिकारी, संचालक, अधिकारी, कर्मचारी व दैनंदिन ठेव प्रतिनिधी यांचे विशेष कौतुक केले व सहकार भुषन व सहकार महर्षी पुरस्कार प्राप्त ज्ञानदीप संस्थेचा वटवुक्ष डोलदार व्हावा या करीता शुभेच्छा दिल्या.,
नायब तहसिलदार वैशाली जायगुडे - घोरपडे यांनी गेली १७ वर्षापासन संस्थेशी माझे माझे कुटुंबियांचे अतुट नाते असल्याचे सांगुन संस्था ही लोकांची गरज ओळखुन प्रामाणिकपणे कामकाज करीत असल्याचे सांगितले.
तदनंतर प्रा. दत्तात्रय वाघचवरे यांनी संस्था व ज्ञानदीप स्कुल विषयी माहीती दिली. तसेच. ज्येष्ठ
पत्रकार दत्ता मर्ढेकर यांनी संस्थेची यशोगाथा, कर्मचारी / प्रतिनिधी यांचे संयुक्त अधिवेशन, संस्थेत दररोज
होणा-या गणपती आरतीने कामकाजीची सुरुवात मंगलमय केल्याने ग्राहकांना अधिकची सेवा मिळते. असे
सांगितले तर अध्यक्ष दिलीप चव्हाण यांनी संस्थेची सुरुवात, आर्थिक उलाढाल, सामाजिक कार्य याबाबत
माहीती दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विठठ्ल माने यांनी केले. प्रस्ताविक शाखाप्रमुख मधुकर यादव यांनी
केली. प्रमुख पाहुणे यांचा सत्कार संचालिका सौ छाया शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. व मान्यवरांच्या
हस्ते कु. प्रतिक्षा कदम, कु. प्रथमेश पिसाळ, कु. धनश्री यादव, कु· ईश्वरी जगताप, कु. अभिषेक कदम, कु. कादंबरी
जाधव, कु. निखील खोमणे आदींचा यशोचित सत्कार करण्यात आला.
सदर कार्यक्रमास ओम दत्तचैतन्य बॅकेचे अध्यक्ष रतनसिंह शिंदे, सातारा जिल्हा बँकेच्या वाई
शाखाप्रमुख एस. व्ही. सावंत, नागेश्वर पतसंस्था वाई शाखाप्रमुख संतोष पवार, भद्रेश्वर पतसंस्थेच्या
व्यवस्थापिका. संगिता बारटक्के, केशव वाडकर, शिवाजी निंबाळकर, अॅड. सुमंत पवार, शिवाजी वनारसे,
भगवान गाढवे, दिलीप डेरे, सुरज कदम, ज्ञानेश्वर यादव, अशोक जाधव आदी सभासद, ठेवीदार उपस्थितं
होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रमोद पवार, विनोद कांगडे, बापु पोळ, अमर धापते, संदीप येवले, किरण
पोळ, धनंजय पिसाळ, प्रशांत चौधरी आदींनी विशेष परिश्रम घेतले. आभार संस्थेच्या संचालिका छाया
शिंदे यांनी मानले.