बारामती पश्चिम ! मु.सा. काकडे महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडादिन साजरा

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर:- प्रतिनिधी
येथील मु.सा. काकडे महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त डॉ. रुपेश थोपटे क्रीडा व शारीरिक शिक्षण संचालक आंबेडकर महाविद्यालय येरवडा पुणे यांचे योगाचे दैनंदिन जीवनातील महत्त्व यावर व्याख्यान आयोजित केले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या उपस्थितीत हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.महाविद्यालयाचे प्राचार्य. डॉ देविदास वायदंडे यांनी याप्रसंगी राष्ट्रीय क्रीडादिनाचे महत्व काय व विद्यार्थ्यांनी त्यापासून प्रेरणा घेऊन महाविद्यालयात विद्यार्थ्यांना व्यायामाशी खेळाशी संबंधित सर्व सुविधा पुरविल्या जातील अशी ग्वाही देऊन विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा व महाविद्यालयाचे परिसराचे नाव खेळामध्ये उज्वल करावे असे आवाहन आपल्या अध्यक्षीय मनोगतात केले.
कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक डॉ.रुपेश थोपटे यांनी वेगवेगळ्या प्रात्यकशिकाच्या माध्यमातून शरीरातील होणाऱ्या आजारांवर कशी मात करता येईल याविषयी प्रात्यक्षिक करून दाखविले त्याचबरोबर आजार होऊ नयेत म्हणून विद्यार्थ्यांना,प्राध्यापक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी काय काळजी घ्यावी याविषयी प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून मार्गदर्शन केले.तसेच चालणे,उभे राहणे,बसणे या स्थितीतील चुकीच्या सवयीमुळे सांध्याचे शारीरिक आजार कसे होतात याविषयी माहिती सांगितली तसेच तुम्ही शरीराला योग्य सवयी लावल्यामुळे मोठमोठ्या शारीरिक आजारांपासून कशी मुक्तता मिळेल याविषयी उपस्थिताना मार्गदर्शन केले.
तसेच स्नॅप शूट फायरिंग औरंगाबाद येथे झालेल्या कॉम्पिटिशन मध्ये मु.सा. काकडे महाविद्यालयातील एन.सी.सी. कॅडेट निलेश दत्तात्रय गायकवाड या विद्यार्थ्यांचा प्रथम क्रमांक आला होता. त्याला औरंगाबाद येथे स्नॅप शूट कॉम्पिटिशन मध्ये गोल्ड मेडल मिळाले आहे त्याचा सत्कार कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते करण्यात आला 
संस्थेचे अध्यक्ष मा. सतीशराव काकडे देशमुख,सचिव जयवंतराव घोरपडे यांनी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या सहसचिव सतीश लकडे यांनी कार्यक्रमास उपस्थित राहून अशा प्रकारचे उपक्रम महाविद्यालयात सतत राबवावे असे आवाहन केले याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ जगन्नाथ साळवे आय.क्यू .ए.सी समन्वयक डॉ.संजू जाधव,व्यवस्थापनसमिती सदस्या.सुजाता भोईटे कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य प्रा.रवींद्र जगताप तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कार्यक्रमाचे संयोजक डॉ.बाळासाहेब मरगजे,प्रा.दत्तराज जगताप,डॉ.श्रीकांत घाडगे यांनी परिश्रम घेतले प्रा.दत्तराज जगताप यांनी उपस्थितांचे आभार मानले.
To Top