सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील मुरूम येथील पत्रकार युवराज खोमणे यांना पत्रकारिता क्षेत्रातील तसेच वडगाव निंबाळकर येथील महेंद्र माने यांना कला क्षेत्रातील व वाणेवाडी येथील सायली जगताप हिला क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल आद्याकांतीवीर उमाजी नाईक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
दि २५ ,रोजी होळ ता बारामती येथे हा कार्यक्रम पार पडला. अध्यक्षस्थानी जय मल्हार क्रांतीवीर संघटनेचे राज्याध्यक्ष दौलत शितोळे होते. याव्यतिरिक्त स्पर्धापरीक्षा विनोद चव्हाण, कलाक्षेत्र शिवम जादूगार, स्पर्धापरीक्षा श्रद्धा होळकर, शिक्षण क्षेत्र अनिल गवळी यांनादेखील पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी बारामती तालूका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, संगीताराजे निंबाळकर, सोमेश्वर कारखान्याचे उपाध्यक्ष आनंदकुमार होळकर, संजय जाधव व नानासाहेब मदने, सिद्धार्थ गीते, कौस्तुभ चव्हाण, प्रवीण कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार युवराज शिंदे यांनी मानले.