सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील वाघळवाडी येथील पीकअप जीप व छोटा हत्ती यांची नीरा बारामती रस्त्यावर समोरासमोर धडक झाली यामध्ये दोन्ही गाड्यांच्या चालकांना साई सेवा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तर अवघ्या दहा मिनिटांच्या फरकाने बस स्टँडवर थांबलेल्या बसला एका चारचाकीने पाठीमागून धडक दिल्याने एक मुलगा जखमी झाला असल्याची माहिती करंजेपुल पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक योगेश शेलार यांनी दिली.