फ्लेस हटवले ! कोऱ्हाळे बुद्रुकच्या बस स्थानकाने घेतला मोकळा श्वास : 'सोमेश्वर रिपोर्टर' बातमीचा परिणाम

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम------
कोऱ्हाळे बुद्रुक - प्रतिनिधी
कोऱ्हाळे बुद्रुक बस स्थानकावर मोठ्या प्रमाणावर फ्लेक्स लावत जाहिराती करण्यात आल्या होत्या. याबाबत आज सकाळी सोमेश्वर रिपोर्टर ने सविस्तर बातमी प्रसिद्ध केली होती. त्यानंतर बारा तासांच्या आत सर्व बॅनर उतरविण्यात आले. 
            या बस स्थानकावर सतत बारा महिने वेगवेगळे फ्लेक्स झळकत असतात. त्यामुळे बस स्थानक आहे की नाही हे दिसतच नव्हते. बस स्थानक असून त्याचा वापर प्रवाश्यांना करता येत नव्हता. विद्यार्थिनींची ही मोठी कुचंबणा होत होती. याबाबत सोमश्र्वर रिपोर्टर ने बातमी प्रसिध्द केल्याने संबंधितांनी फ्लेक्स उतरवले आहेत. त्यामुळे आता बस स्थानकाने खऱ्या अर्थाने मोकळा श्वास घेतला आहे. गावातील ग्रामस्थांनी व विद्यार्थी वर्गाने या बातमीसाठी सोमेश्वर रिपोर्टरचे आभार मानले आहेत.
To Top