भोर बसस्थानकात पडलेले खड्डे संबंधित विभागाला कधी दिसलेच नाहीत...! विद्यार्थी आणि प्रवाशांची होणारी ससेहोलपट पाहून शिवसैनिकांनी बुजविले खड्डे

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्यातील एसटी बस स्थानकात गेली कित्येक महिने भेडसावत असलेली स्थानक आवारातील खड्ड्यांची समस्या अखेर भोर तालुक्यातील शिवसैनिकांनी पुढाकार घेवून मोठ - मोठे खड्डे बुजवून दूर केली.                                          अनेक दिवसांपासून प्रवासी  नागरीकांची अडचण लक्षात घेऊन भोर तालुका शिवसेना पक्ष व भोर तालुका समन्वयक भरत नाना साळुंके यांच्या संकल्पनेतून एसटी बस स्थानक आवारातील खड्ड्यात मुरुम टाकून खड्डे बुजवीन्यात आले.बस स्थानकावर आवरातील खड्डे बुजविण्यासाठी प्रवाशी नागरिक व हजारो विद्यार्थ्यांकडून ा अनेकदा मागणी होत होती.तर या समस्येमुळे नागरिक व विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत होता.मात्र या समस्येकडे भोर एसटी आगार व्यवस्थापक तसेच राजकीय पुढार्‍यांकडून दुर्लक्ष केले जात होते. तालुक्यातील शिवसैनिकांनी पुढाकार घेवून समाज हिताचे काम केल्याने त्यांचे अभिनंदन होत आहे.यावेळी भोर तालुका शिवसेना प्रमुख हनुमंत कंक ,भोर शहर प्रमुख नितीन सोनवणे, युवा सैनिक समीर घोडेकर, नितीन बुदगुडे, शुभम खोपडे, मंगेश खाटपे, विशाल गुरव, तुषार गोळे, आनंद गोळे, महेश भोमे विनायक साळुंके ,सुरेश गोळे, सचिन चूनाडी , अशोक गोळे ,अंकुश गोळे तसेच भोर आगारातील अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.
To Top