सोमेश्वर रिपोर्टर टीम------
नीरा : प्रतिनिधी
नीरा-गुळुंचे रस्त्यावर सायंकाळी रस्त्यावर टाकलेल्या खडीवरून कार पलटी होऊन अवघ्या आठ तासात दुसरा अपघात झाला आहे. यामध्ये एकजण जखमी झाला असून त्याच्यावर नीरा येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
निलेश लकडे असे अपघातात जखमी झालेल्या युवकाचे नांव आहे. आज सकाळी कोरेगाव जि. सातारा येथील प्रसाद नंदकुमार सांबेकार हे आपल्या पत्नी शिवानी व मुलगा ओंकार सातारा-नगर रस्त्यावरन कामानिमित्त शिरूर याठिकाणी निघाले असता नीरा-गुळुंचे रस्त्यावर नीरा कॅनॉल शेजारी जगताप वस्तीनाजीक खड्डे बुजवण्यासाठी रस्त्यावर टाकलेल्या खडीवरून गाडी घसरून रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्यात पडली. यामध्ये गाडीतले तिघे किरकोळ जखमी झाले होते.