सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
भोर : प्रतिनिधी
भोर शहरातील माजी नगराध्यक्ष तसेच भोर तालुका भाजपा महिला अध्यक्ष दिपाली सतीश शेटे व माजी नगरसेवक सतीश शेटे आयोजित यांनी २०२२ चा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सर्वोत्कृष्ट लाइटिंग डेकोरेशनचे मानकरी अमर तरुण मंडळ राजवाडा व गोल्डन तरुण मंडळ मंगळवार पेठ ठरले.
शेटे यांच्याकडून २०२२ गणेशोत्सव काळात सर्वोत्कृष्ट लाइटिंग डेकोरेशन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.या स्पर्धेत शहरातील अनेक सार्वजनिक मंडळांनी भाग घेतला होता. या स्पर्धेत पहिले बक्षीस २१ हजार रुपयांचे ठेवण्यात आले होते.यातील अमर तरुण मंडळ राजवाडा व गोल्डन तरुण मंडळ मंगळवार पेठ यांची लाइटिंग उत्कृष्ट तसेच एकसारखी असल्याने या दोन मंडळांना विभागून रोख ११ हजार रुपये बक्षीस व सन्मानचिन्ह देवून तहसीलदार सचिन पाटील ,पोलीस निरीक्षक विठ्ठल दबडे,सतीश शेटे,दिपाली शेटे यांच्या हस्ते शुक्रवार दि.९ अनंत चतुर्दशी बाप्पांच्या विसर्जन सोहळ्यावेळी नगरपालिका चौक येथे सन्मानित करण्यात आले