सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर वाघळवाडी येथील विद्या प्रतिष्ठानने जागा उपलब्ध करुन दिल्यामुळे उद्या दि १२ पासून सोमेश्वरनगर परिसरातील शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना बस पास मिळणार आहेत.
याबाबत विद्या प्रतिष्ठान चे प्राचार्य सचिन पाठक यांनी बारामती आगाराशी पत्रव्यवहार केला होता. त्यानुसार बारामती आगाराने दिलेल्या पत्रात म्हंटले आहे की, आपण आपल्या विद्या प्रतिष्ठान शाळेमध्ये विद्यार्थी पाससाठी जागा व टेबल खुर्ची उपलब्ध करून देणे बाबत मंजुरी दिली आहे. बारामती आगारामार्फत सोमवार दिनांक १२/०९/२०२२ रोजी पासून एक वाहतुक नियंत्रक / विद्यार्थी पास कर्मचारी आपल्या शाळेमध्ये येवून विद्यार्थी पास वितरीत करतील. सर्व प्रकारचे विध्यार्थी पासेस तसेच मुलींचे अहिल्यादेवी होळकर पासेस वितरीत करतील. सोमेश्वर परिसरातील सर्व शाळा सदर ठिकाणावरून विद्यार्थी पासेस घेतील. परिसरातील सर्वच शाळा व विद्यार्थयांना सदर ठिकाण सोयीचे होईल विद्यार्थ्याचा शैक्षणीक वेळ व श्रम वाचतील
करंजेपूल, सोमेश्वरनगर, वाघळवाडी परिसरातील सर्व शाळांना / विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते कि आपण विद्या प्रतिष्ठान इंग्लिश मिडीयम स्कूल, सोमेश्वरनगर वाघळवाडी ता. बारामती येथून विद्यार्थी पास घेण्यात यावे. असे बारामती आगार व्यवस्थापक यांनी कळविले आहे.
---------------------
रमाकांत गायकवाड : वाहतूक नियंत्रक पुणे
उद्या पासून सोमेश्वरनगर परिसरातील सर्व शाळा व महाविद्यालयातील मुलांना बस पास देण्याची सोय करण्यात आली आहे. याची वेळ सकाळी ८ ते ४ राहणार असून
महिन्यातला एक आठवडा याठिकाणी बस पास चे वाटप करण्यात येणार आहे.