सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
वाई : प्रतिनिधी
भुईंज ता. वाई येथे दसरा उत्सवानिमित्त दरवर्षी मित्र कीडा मंडळ भुईज यांच्यावतीने भव्य कवड्डी स्पर्धेचे आयोजन केले जाते. याही वर्षी दिनांक २ ऑक्टोबर ते ४ ऑक्टोबर २०२२ पर्यंत पुरूष आणि महिला कबड्डी स्पर्धेचे आयोजन सुसज्ज अशा पेक्षक गॉलरीमध्ये शिवाजी मैदान भुईज येथे केले असल्याचे मित्र कीडा मंडळाचे अध्यक्ष दिलीप दळवी व उपाध्यक्ष किरण शंकर जाधव व सचिन गायकवाड यांनी सांगितले.
नियोजित कवड्डी स्पर्धेचा शुभारंभ दिनांक २ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी ९ वाजता माजी आमदार मदनदादा भोसले, जिल्हा कीडा अधिकारी सातारचे युवराज नाईक, महाराष्ट्र राज्य कवड्डी कार्यकारणी सदस्य व उपाध्यक्ष सातारा जिल्हा कबड्डी असोसिएशनचे उत्तमराव माने, वाईच्या पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ. शितल जाणवे खराडे, वाई पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाळासाहेव भरणे यांच्या शुभहस्ते आणि त्याचवरोवर महिला कवड्डी स्पर्धेचा शुभारंभ श्री महालक्ष्मी शिक्षण संस्थेच्या कार्यवाहक डॉ. सुरभि भोसले व भुईंज ग्रामपंचायत सरपंच पुष्पा भोगले यांच्या शुभहस्ते होणार आहे.
भरवण्यात येत असलेले सामने प्रो कबड्डी धरतीवर खेळवले जाणार असून यामध्ये ओपन गट पुरूष प्रथम क्रमांकाचे बक्षीस रोख रक्कम रू. २५,५०१/- आणि कायम चपक, द्वितीय कमांकाचे बक्षीस रोख रक्कम रु. १५,५०१/- आणि कायम चपक तसेच तृतीय क्रमांकाचे वक्षीस रोख रक्कम रू. ११,१०१/- व कायम चपक असे असणार आहे. त्याचवरोवर आदर्श व शिस्तबद्ध संघास वक्षीस म्हणून रोख रक्कम रू. ३,३३३/- देण्यात येणार असून उत्कृष्ट पकडीसाठी वक्षीस रोख रु.१,५५५/- दिले जाणार आहे.
याशिवाय ५५ किलो पुरुष गट प्रथम क्रमांकाचे वक्षीस रोख रु.१५,००१/- आणि कायम चपक, द्वितीय क्रमांकाचे बक्षीस रोख रु.११,००१/- आणि कायम चपक तसेच तृतीय क्रमांकाचे बक्षीस रोख रु. ७,००१/- आणि कायम चपक सोवत आदर्श, शिस्तबद्ध, उत्कृष्ट चढाई आणि उत्कृष्ट पडकसाठी आकर्षक वक्षीस देण्यात येणार आहेत.
वरील स्पर्धेसाठी राज्यभरातून कवड्डी संघ येत असतात. भुईज पासून २५ कि. मी अंतरापुढील संघांची भोजनाची व्यवस्था केली आहे. स्पर्धेमध्ये भाग घेणा-या सर्व संघांनी शनिवार दिनांक १ ऑक्टोबर २०२२ पर्यंतच आपले ऑनलाईन प्रवेश फी रु. ५००/- भरून नाव नोंदणी
करावयाची आहे. तरी संपर्कासाठी चंद्रकांत निकम मो. ९७६५५७६४०२, सचिन गायकवाड ९९६०९६७९९७ या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन संयोजकांनी केलेले आहे.