भोर ! प्रतिनिधी : संतोष म्हस्के ! तालुक्यात लंपी स्किनची दोन जनावरे आढळली : शेतकरी धास्तावला

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्याच्या उत्तरेकडील बसरापूर ता.भोर लंपी स्किन विषाणू २ पाळीव जनावरे आढळली असल्याने तालुक्यातील गोठा मालक तसेच शेतकरी वर्ग धास्तावला आहे.
           या पार्श्वभूमीवर तत्काळ ५ किलोमिटर (परीघ) मधील शेतकऱ्यांच्या जनावरांना पशुसंवर्धन विभागाकडून लसीकरण करण्यास सुरुवात केली असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन तालुका लघु चिकित्सालय डॉ.प्रशांत सोनटक्के यांनी सांगितले. तालुक्यातील बसरापूर येथील शेतकरी अविनाश कुंभारकर यांची एक गाय व जयतपाड येथील शेतकरी हेमंत लक्ष्मण गोरे यांचा एक बैल असे ऐकून २ पाळीव लंपी स्किन या आजाराने त्रस्त असल्याचे समोर आले आहे.तालुक्यात तसेच बसरापूर व जयतपाड ता.भोर गावांच्या शेजारच्या गावांमध्ये लंपी स्किन आजार पसरू नये यासाठी तात्काळ  येथील शेतकऱ्यांच्या जनावरांना उपचार चालू केले असून ५ किलोमीटरच्या परिसरात लसीकरणाची सुरुवात केली गेली आहे. लसीकरण युद्ध पातळीवर सुरू असून यावेळी पशुधन विकास अधिकारी विस्तार डॉ. पौर्णिमा येवतीकर ,पशुधन विकास अधिकारी तालुका लघु चिकित्सालय डॉ. शुभांगी गावकरे,डॉ.मंगेश टिळेकर तसेच तालुक्यातील पशुसंवर्धन विभागाचे अनेक डॉक्टर्स होते.
To Top