सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
वाई : दौलतराव पिसाळ
वाई बसस्थानकातील रस्त्यांच्या कॉंक्रीटीकरण साठी ८० लाखांचा निधी देण्यासोबत वाई तालुक्यातील प्रवासी वाहतुकीसाठी आवश्यक असलेल्या २० जादा बसेस तातडीने उपलब्ध करून देण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले असल्याची माहिती माजी आमदार मदन भोसले यांनी दिली.
याबाबत त्यांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वी व्याजवाडी कडेगाव फाट्यावर एस टी बसचा अपघात झाला तेव्हा अपघातस्थळी आणि वाई बसस्थानकात भेट दिली. त्यावेळी वाई बसस्थानक आवारातील रस्त्यांचे दुरुस्ती अंदाजपत्रक तयार करण्याबाबत सांगितले होते. त्यासाठी निधीची मागणी करणारे निवेदन उपमुख्यमंत्री फडणवीस यांना दिले. तसेच वाई तालुक्यात बसेसचा तुटवडा असल्याने अनेक गावात आजही एस टी बससेवा बंद आहे तर अनेक गावात अपुऱ्या फेऱ्या होत आहेत. यामुळे विशेषतः विद्यार्थी आणि जनतेचे हाल सुरू आहेत. वाई आगाराकडे कर्मचारी वर्ग पुरेसा आहे मात्र बसेस अपुऱ्या असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. ही बाब निदर्शनास आणून देताच वाई बसस्थानकातील अंतर्गत रस्ते दुरुस्तीसाठी ८० लाख निधी आणि आगारासाठी तातडीने २० जादा बसेस उपलब्ध करण्याचे आदेश उपमुख्यमंत्र्यांनी दिले. त्यांनी तत्परता दाखवत सर्वसामान्य जनतेच्या जिव्हाळयाच्या प्रश्र्नी लक्ष घालून आदेश दिल्याबद्दल मदन भोसले यांनी वाई तालुक्याच्या वतीने त्यांचे आभार मानले