बारामती पश्चिम ! वाघळवाडी येथील सह्याद्री पब्लिक स्कूल येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम---  -
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
दिनांक 5 सप्टेंबर रोजी एस डी सह्याद्री पब्लिक स्कूल  येथे शिक्षक दिन व श्री गणेशाच्या आगमना निमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी शिक्षक दिनाचे औचित्य विविध विषयांवर आपले मनोगत व्यक्त केले. विद्यार्थिनींनी वेगवेगळ्या कवितांचे सादरीकरण केले . 
      सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये विविध बालनाट्य, श्री गणरायाची गाणी होती. विद्यार्थ्यांच्या नृत्यामुळे शाळेतील परिसर अगदी भक्तिमय होऊन भारावून गेला होता किशोरी काकडे यांनी विद्यार्थ्यांना आपल्या भाषणातून शिक्षकांबरोबरच आई-वडिलांच्या संस्काराचे महत्त्व देखील सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी धनश्री सावंत व  किशोरी काकडे यांनी भूषवले या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष अजिंक्य सावंत सह्याद्री पब्लिक स्कूलचे प्राचार्य वाघमारे सर व सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते .कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रतीक्षा रावते व गौरी साळुंखे या विद्यार्थिनींनी केले होते. सांस्कृतिक कार्यक्रमचे नियोजन इयत्ता नर्सरी ते  दहावीचे वर्गशिक्षक व सांस्कृतिक विभागातील शिक्षक शितल पवार, दीप लक्ष्मी जाधव ,आस्मा पठाण, वैशाली गायकवाड, संग्राम धुमाळ, साजिद शेख या शिक्षकांनी केले होते. दिग्विजय गायकवाड व संयोगिता चव्हाण यांनी आभार व्यक्त केले.
To Top