सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
भोर शहरातील श्री वेताळ पेठ जुनी तालीम ट्रस्ट गणेशोत्सव मंडळ आयोजित होममिनिस्टर स्पर्धा उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेत १०० हून अधिक महिलांनी सहभाग घेतला होता. त्यात होममिनिस्टरचा मान गृहिणी दिपाली सचिन निगडे यांनी पटकविला.
वेताळ पेठ जुनी तालीम मंडळ दरवर्षी सामाजिक नवनवीन उपक्रम राबवित असते. यंदा शालेय विद्यार्थ्यांच्या खेळांच्या स्पर्धा तसेच होममिनिस्टर स्पर्धा राबविण्यात आली.या स्पर्धेत प्रथम दिपाली सचिन निगडे(कपाट) ,द्वितीय रेश्मा सागर दिघे(ड्रेसिंग टेबल),तृतीय पौर्णिमा विशाल चांगण(एलइडी टीव्ही कपाट), चतुर्थ मोनाली शिवराम केदार (देव्हारा)तर पाचवा क्रमांक डिंपल विजय बिरामणे (कुलर) यांनी पटकवीला.यावेळी कै.शंकर पवार,कै.सदाशिव पवार, कै.बाळासाहेब भेलके यांच्या स्मरणार्थ गणेश पवार,सुनील पवार,शहाजी भेलके यांनी तर सुरेश कदम व सागर दिघे यांनी वैयक्तिक भक्षिसे दिली.तसेच सचिन निगडे ,विशाल सणस, संजय निकुडे ,संतोष गायकवाड यांनी होममिनिस्टर स्पर्धेत सहभागी महिलांना भेटवस्तू दिल्या.