सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
कोणत्याही देशाचे उज्वल भविष्य हे त्या देशातील शिक्षकांवर अवलंबून असते. तरुणांना योग्य दिशेने वाटचाल व्हावी म्हणून शिक्षकच योग्य मार्गदर्शन करत असतात . डॉक्टर , इंजिनिअर , शिक्षक , शेतकरी , व्यापारी, सोबतच सर्वच क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांचा पाया हा शिक्षकच मजबूत करत असतो . नैतिक व आदर्श नागरिक घडवण्यासाठी शिक्षकांचे अविभाज्य योगदान आहे .
५ सप्टेंबर ...डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन. हा दिवस त्यांच्याच सूचनेनुसार शिक्षकदिन म्हणून साजरा केला जातो . त्या मागे फक्त स्वतःचा जन्मदिनच साजरा न करता शिक्षकांचा सन्मान व्हावा , त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा सोहळा व्हावा हा उदात्त हेतू होता .काळ बदलत असेल तरी काही गोष्टी बदलू नयेत . शिक्षकांच्या प्रति तसूभरही सन्मान कमी होऊ नये . पण प्रशांत बंब सारखे बेजबाबदार लोकप्रतिनिधी जेव्हा शिक्षकांची प्रतिष्ठा जाणूनबुजून कमी करण्याचा प्रयत्न करतात . शैक्षणिक वातावरण प्रदूषित करतात तेव्हा शिक्षक दिनाच्या निमित्ताने समाज म्हणून आपण शिक्षकांच्या मागे बिनशर्त उभे राहणे आपले कर्तव्य आहे . साद संवाद स्वच्छता टीमने याच सामाजिक दृष्टीने आम्ही आपणा सोबत आहोत ह्या भावना व्यक्त करण्यासाठी गावातील न्यू इंग्लिश स्कुल वाणेवाडी व जिल्हा परिषद शाळा वाणेवाडी येथे जाऊन तेथील मुख्याध्यापक श्री .कांबळे सर व सौ कदम मॅडम आणि सर्व शिक्षकवृंद यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला . शिक्षणाचे सोपान हे स्वयंप्रेरणेने चालत असते . मानसिक बळ देणे , योग्य सन्मान राखणे , हे समाजाचे कर्तव्य आहे . साद संवाद स्वच्छता टीम ने आज शिक्षक दिन साजरा करताना शिक्षकांचा मानसन्मान वाढावा म्हणून हा छोटेखानी उत्सव साजरा केला .
यावेळी साद संवाद ग्रुप चे शशिकांत जेधे, adv. नवनाथ भोसले, पत्रकार युवराज खोमणे, सुजित भोसले, इंद्रजित भोसले, शंकर कोकरे, किरण जगताप, पुष्कराज जगताप, अथर्व सटाले, ओम जगताप आदी उपस्थित होते.