सोमेश्वर रिपोर्टर टिम-------------
जावली : प्रतिनिधी (धनंजय गोरे )
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या अधिका-यांनी कास पठाराला भेट देऊन येथे करावयाच्या भौतिक सुविधांबाबत पाहणी केली.
जागतिक वारसा स्थळ असलेल्या कास पठारावर दरवर्षी लाखो पर्यटक भेट देत असतात. पन त्यामानाने येथील सुविधा कमी पडतात. पर्यटकांच्या सोयीच्या दृष्टीने प्रशस्त स्वच्छतागृह, माहिती केंद्र, पार्किंग या सुविधा निर्माण करण्याच्या दृष्टीने हा पाणी दौरा करण्यात आला. या कामांसाठी वन विभागाची जागा वापरता येणार नसल्यामुळे खाजगी जागांवरतीच हे प्रकल्प उभे केले जाणार आहेत. त्या दृष्टीने कास पठार कार्यकारी समितीचे उपाध्यक्ष दत्ता किर्दत यांनी अधिकाऱ्यांना परिसरातील खाजगी दाखला जागा दाखवल्या. यामध्ये कास ग्रामस्थांची तलावाच्या वरच्या बाजूची दहा एकर जागा तसेच कास बंगल्याच्या वरील शासकीय मालकीची सात एकर जागा व कासाने गावाजवळील तीन एकर जागा दाखवण्यात आली. या जागांची पाहणी करून लवकरच स्वच्छतागृह, पार्किंग व माहिती केंद्र याबाबत निर्णय घेतले जातील असे अधिकाऱ्यांनी सांगितले. या भेटीमध्ये महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या रिजनल मॅनेजर मोसमी कोसे, पर्यटन संचालनालयाच्या उपसंचालक सुप्रिया करमकर यांनी पाहणी केली. यावेळी कास पठार समितीचे उपाध्यक्ष दत्ता किर्दत, सोमनाथ बुढळे, विजय बादापुरे, योगेश काळे, संदिप साळुंखे उपस्थित होते. समितीच्या वतीने अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला