पुरंदर ! प्रतिनिधी : विजय लकडे ! पुढच्याने मारला ब्रेक....! एकावर एक सहा चारचाकी गाड्या धडकला : पुणे-पंढरपूर रस्त्यावरील पिंपरे येथील प्रकार

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
नीरा : प्रतिनिधी
पुरंदर तालुक्यातील पिंपरे ता पुरंदर येथे नीरा डाव्या काळाव्याशेजारी सोमेश्वर टायर दुकानापुढे पुढच्या एका चारचाकी गाडीने जाग्यावरच ब्रेक मारल्याने पाठीमागून येणाऱ्या पाच ते सहा गाड्या एकमेकांवर येऊन आदल्याने अनेक चारचाकींचे लाखोंत तोटा झाला आहे. 
          सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. पुणेच्या दिशेने पंढरपूर च्या दिशेने जाणाऱ्या सहा चारचाकी गाड्या एका पाठोपाठ एकमेकांवर आदल्याने गाड्यांचे फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. कोणकोणाला धडकले आहे कोणालाच समजले नसल्याने त्या ठिकाणी दोन तासापेक्षा अधिक काळ भांडणे सुरू असल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.
To Top