सोमेश्वर रिपोर्टर टीम---
नीरा : प्रतिनिधी
कोरेगाव जि. सातारा येथील प्रसाद नंदकुमार सांबेकार हे आपल्या पत्नी शिवानी व मुलगा ओंकार सातारा-नगर रस्त्यावरन कामानिमित्त शिरूर याठिकाणी निघाले असता नीरा-गुळुंचे रस्त्यावर नीरा कॅनॉल शेजारी जगताप वस्तीनाजीक खड्डे बुजवण्यासाठी रस्त्यावर टाकलेल्या खडीवरून गाडी घसरून रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्यात पडली. यामध्ये गाडीतले तिघे किरकोळ जखमी झाले आहेत. सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला.
त्यामुळे रत्याच्या निकृष्ट कामाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर येत आहे.