वाई ! कर्ज परतफेडीवेळी संस्थेबद्दल आपुलकीचा विचार सभासदांच्या मनात रुजावा : अनिल कवडे

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम---   
वाई :दौलतराव पिसाळ
सभासद,जनतेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यातून सहकार चळवळ बळकट होईल,त्यासाठी संचालकांनी सेवाभाव जपला पाहिजे.माझ्या अडचणीच्या काळात या संस्थेने मला मदत केली आहे,कर्ज परतफेड करताना मी संस्थेला मदत केली पाहिजे,असा विचार रुजविण्याचा राज्य पतसंस्था फेडरेशनने प्रयत्न करावा,असे आवाहन राज्याचे सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी केले.
राज्य बिगरकृषी सहकारी पतसंस्था फेडरेशन व ज्ञानदीप को-ऑपरेटिव्ह सोसायटी यांच्या वतीने आयोजित एक दिवसीय कार्यशाळेत मार्गदर्शन करताना श्री.कवडे बोलत होते.
विभागीय सहनिबंधक अरुण काकडे,जिल्हा उपनिबंधक मनोहर माळी,फेडरेशनचे उपनिबंधक अजयकुमार भालके,रवींद्र केंजळे,चंद्रकांत शिंदे,दुष्यंत जगदाळे,छाया शिंदे,दुर्गा वाघ,निवृत्ती मस्के,हणमंत धिवार,यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्री कवडे म्हणाले,सामान्यांचे दरडोई उत्पन्न वाढविण्यात व रोजगार निर्मितीमध्ये पतसंस्था मोठे योगदान देऊ शकतात. कर्जदार समृद्ध झाला तर त्यातच संस्थांची प्रगती सामावलेली आहे.त्यामुळे कर्जदाराला मार्गदर्शन आणि आधार देणे गरजेचे आहे,असेही ते म्हणाले.
विश्वनाथ पवार यांनी जनतेला पतसंस्थांकडील ठेवींना विमा संरक्षण असावे,असे वाटते. ते विश्वासावर पैसे ठेवतात, ठेवीदारांना ठेव कोठे ठेवावी, याचे मार्गदर्शन मिळणे आवश्यक आहे.जास्तीचा लाभ मिळविण्यापेक्षा सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे,यासाठी शासन, सहकार विभागाने मार्गदर्शन करावे,असे आवाहन त्यांनी केले.
फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष जिजाबा पवार यांनी प्रास्ताविकात सातारा जिल्ह्यातील पतसंस्थांना फेडरेशनच्या कर्ज वितरण व वसुलीसाठी मार्गदर्शन मिळावे, या हेतूने प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन केल्याचे सांगितले.
ठेव संरक्षण महामंडळास शासनाने १०० कोटी व पतसंस्थांनी १०० कोटी देऊन ठेवी संरक्षित कराव्यात,अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 
सहकार अधिकारी डॉ.मच्छिंद्र मुरुडकर यांनी कर्ज वितरण व कर्ज वसुली याविषयी मार्गदर्शन केले.
एकनाथ जगताप,चंद्रकांत ढमाळ, बाळकृष्ण पवार,सुधाकर मोरे,दत्तात्रय नावडकर श्रीकांत यादव, दीपक पवार,शशिकांत भिलारे,हंबीरराव पवार यांनी स्वागत केले.दिनकर गाढवे यांनी आभार मानले.खंडाळा साखर कारखान्याच्या अध्यक्ष, संचालकपदी विश्वनाथ पवार,गजानन धुमाळ यांची तर ज्ञानदीप सोसायटीच्या मुख्य व्यवस्थापकपदी निवड झाल्याबद्दल लक्ष्मण चव्हाण
यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास विजय कासुर्डे, अनुप पवार,बाळासाहेब वांजळे संजय पवार,जिल्ह्यातील पतसंस्थांचे संचालक अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
To Top