सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
भोर - प्रतिनिधी
अनंत चतुर्दशीला भोर शहरात सार्वजनिक पाच ते सहा गणेशोत्सव मंडळांच्या विसर्जन मिरवणुका अत्यंत जल्लोषात शांततामय वातावरणात पारंपारिक वाद्यांच्या निनादात पार पडल्या.या विसर्जन मिरवणुकांमध्ये जय हनुमान गणेशोत्सव मंडळ भेलकेवाडी येथील चिमुकल्यांनी ढोल-ताशा बांधून विसर्जन मिरवणूक गाजवली असल्याने हे चिमुकले भाविक भक्तांचेच चहाते ठरले.
तालुक्याच्या ग्रामीण भागात घरगुती वीस ते पंचवीस गणपती तर शहरात जवाहर तरुण मंडळ (चौपाटी),तुफान मित्रमंडळ भोर,श्रीमंत सावतामाळी गणेशमंडळ (पीराचामळा),श्री विठ्ठल मंदिर भेलकेवडी,जय हनुमान गणेशोत्सव मंडळ भेलकेवाडी, कुंभार टेकडी तालीम गणेशोत्सव मंडळ यांनी शिस्त बद्धपणे बाप्पांचे विसर्जन केले.यावेळी पारंपरिक ढोल -ताशांच्या खेळावर खेळ गड्यांनी चांगलाच ठेका धरला होता.तर दोन लहानग्या चिमुकल्यांनी ढोल ताशा बांधून खेळ गड्यांना चांगलीच साथ दिली. या दोन चिमुकल्या ढोल ताशा वादकांचे विसर्जन मिरवणुकीत आकर्षण ठरले.यावेळी पोलीस निरीक्षक विठ्ठल दबडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचा बंदोबस्त चोख होता.