बारामती ! ऊसतोडणी व्यवसायात मजुरांना सांभाळणे तारेवरची कसरत : पुरुषोत्तम जगताप

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
न परवणाऱ्या व्यवसायात अकरा टॅक्टर घेऊन प्रभाकर जगताप यांनी धाडस केले आहे. हा व्यवसाय करत असताना तोडणी मंजूर सांभाळणे तारेवरची कसरत असल्याचे सांगत ज्या ज्या वेळी कारखाना अर्थीक अडचण आला त्या त्या वेळी ऊस तोडणी वाहतूक संघटनेने कारखान्याला सहकार्य केले आहे. असे मत सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी व्यक्त केले.  
            सोमेश्वरनगर ता बारामती येथे सोमेश्वर आटोमोबाईल व श्रीकृष्ण टायर दुकानाच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी वाहतूक संगगटनेचे अध्यक्ष प्रदीप काकडे, उद्योजक संतोष कोंढाळकर, शेतकी अधिकारी बापूराव गायकवाड, उद्योजक राजेन्द्र जगताप, सचिन टेकवडे,कृष्णाई पतसंस्थेचे अध्यक्ष सुनील भोसले, उद्योजक दीपक साखरे, विजय जगताप, कैलास मगर,रमेश जगताप, नितीन जगताप आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी 
 राजेंद्र जगताप, बापूराव गायकवाड, सुनील भोसले यांनी आपली मनोगते व्यक्त केली. 
          कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार युवराज शिंदे यांनी मानले. 





सूत्रसंचालन युवराज शिंदे, आभार प्रभाकर जगताप
To Top