निधन वार्ता ! वाई ! यमुना लटिंगे यांचे निधन.

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
वाई : दौलतराव पिसाळ
स्वकुळ साळी समाज वाईचे सचिव व कोंढावळे जि प प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे यांच्या मातोश्री  व बाजारसमितील खाजगी पेढीचे दिवाणजी गणपतराव लंटिगे यांच्या पत्नी सौ.यमुना गणपत लटिंगे वय ७४ यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
         त्या आक्का या नावाने परिचित होत्या.दोन्ही मुलांना शेतात मजुरी करून शिक्षित केले.त्या समंजस व सर्वांशी मिळुनमिसळून असायच्या.आळीतील कोणत्याही सुखदुःखाच्या  धार्मिक व सामाजिक कार्यक्रमात त्याहिरीरीने पुढे लागून कार्य पार पाडत असत.त्याचे पश्चात पती,दोन विवाहीत मुले,सुना,नातवंडे ,पणती असा मोठा परीवार आहे.त्यांचेवर ओझर्डे येथील सोनेश्वर स्मशान भूमीत मान्यवरांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करणेत आले.त्यांच्या अंत्यसंस्कार वेळी शैक्षणिक सहकार सामाजिक राजकीय  क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते .
To Top