सोमेश्वर रिपोर्टर टीम------
शिरोळ : प्रतिनिधी
शेतकरी संघटनेचे नेते तसेच माजी खा. राजू शेट्टी यांनी पीएम किसान योजनेचे त्यांना खात्यावर आलेले सर्व हप्ते परत केले आहेत.
पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत दिला जाणारा दोन हजार रुपयांचा अकरावा हप्ता दि ३१ मे रोजी शेट्टी यांच्या खात्यात जमा झाला. ते लोकसभेचे माजी सदस्य असल्याने या योजनेसाठी केंद्र सरकारच्या धोरणानुसार अपात्र असूनही हा सन्मान निधी माझ्या खात्यावर जमा होत आहे. याआधी त्यांनी स्वत: ६ हप्ते जमा झालेनंतर १२ हजार रूपयाचा धनादेश शासनास परत करून या योजनेतून त्यांना अपात्र करणेबाबत पत्र दिले होते.
तरीही आज अखेर ११ हप्ते नियमीत जमा झालेले आहेत. आज पुन्हा त्यांनी शिरोळ तहसिलदार अपर्णा मोरे धुमाळ यांना भेटून या योजनेतून अपात्र करणेबाबत सुचविले. त्यांनी वारंवार सांगूनही त्यांच्या खात्यावर पैसे यायचे थांबत नाहीत आणि सर्वसामान्य शेतक-यांनी अनेक हेलपाटे घातले तरीसुध्दा त्यांचे पैसे येत नाहीत , काय गौडबंगाल आहे कळत नसल्याचे ते बोलले.