वाई ! गणेश उत्सव मंडळांनी डॉब्लीमुक्त मिरवणूका काढुन पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे : बाळासाहेब भरणे

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
वाई : प्रतिनिधी
कोरोनोच्या आडीच वर्षाच्या कालावधी नंतर मुक्त वातावरणात   वाई शहरात ११४ गणेश मंडळांनी गणेश मुर्ती बसवल्या आहेत त्यामुळे सर्वच कार्यकत्यांन मध्ये मोठा ऊत्साह दिसुन येत आहे . 
           त्यांच्या गणेश विसर्जन मिरवणूका दरम्यान मंडळाच्या जबाबदार कार्यकर्त्यांन सह त्या त्या वार्डातील नगरसेवकांनी डॉब्ली आणी दारु  मुक्त  पारंपारिक वाद्यांचा आधार घेऊन मिरवणूका काढुन कसलेही गालबोट लागणार नाही याची काळजी घेवुन पोलिस प्रशासनाला मदत करत आपण सगळे मिळून  गणरायाला अखेरचा निरोप देवुया असे  आवाहन वाई   पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक बाळासाहेब भरणे यांनी वाई नगरपरिषदेच्या सभागृहात आयोजित बैठकीत केले आहे .या वेळी वाईच्या डिवायएसपी शितल खराडे जानवे  तहसीलदार रणजित भोसले वाई नगरपरिषदेचे मुख्याधिकारी किरण कुमार मोरे व वाई नगरीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व नगरसेवक ऊपस्थित होते .
वाई पोलिस ठाण्याकडे वाई शहरासह  ७१ गावे आहेत. त्या मध्ये वाई शहरात ११४ आणी ग्रामीण भागातील गावांन मध्ये १६० गणेश मंडळे आहेत असे ऐकुन २७४ मंडळे आहेत या सर्वांनी मोठ्या ऊत्साह पुर्ण वातावरणात गणेश मुर्तीची स्थापना केली आहे सर्वच मंडळांनी समाज ऊपयोगी कार्यक्रमांचे आयोजन केले आहे तर अनेक मंडळांनी विविध प्रकारचे देखावे तयार केले असे स्तुत्य  उपक्रम   वाई शहराच्या वैभवात भर घालणारे आहेत यात शंका नाही .पण निघणार्या विसर्जन मिरवणूकी दरम्यान सर्वच मंडळाच्या कार्यकत्यांनी जिल्हा प्रशासनाने घालून दिलेल्या नियम आणी अटींच्या पालन करणे गरजेचे आहे .या दरम्यान मिरवणूकीत दारु पिऊन धिंगाणा करणार्या वर कडक कारवाई करण्यात येणार आहे त्याच बरोबर मंडळांनी अनाधिकृत पणे  डॉब्लीचा वापर केल्यास तात्काळ डॉल्बी सिस्टीम जप्त करुन मंडळांन वर गुन्हे दाखल करण्यात येतील याची नोंद सर्वच गणेश मंडळाच्या पदाधिकारी आणी कार्यकर्त्यांनी घ्यावी तसेच 
तुम्ही नीट वागला नाही तर अशांना वाई पोलिस कायद्याच्या आणल्या शिवाय राहणार नाहीत असा इशारा पोलिस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांनी बैठकीत दिला आहे .
To Top