बारामती ! वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनच्या वतीने आयोजित केलेल्या महारक्तदान शिबिराचे उदघाटन संपन्न

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
भारत देशाच्या स्वातंत्र्याच्या ७५ व्या अमृत महोत्सवानिमित्त बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशन हद्दीत अभिनव देशमुख पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांच्या संकल्पनेतून व  मिलिंद मोहिते अप्पर पोलीस अधीक्षक बारामती विभाग पुणे ग्रामीण तसेच गणेश इंगळे उपविभागीय पोलिस अधिकारी बारामती पुणे ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशन हद्दीतील सर्व गणेश मंडळ सर्व पत्रकार बांधव सर्व ग्रामपंचायत सर्व सामाजिक सेवाभावी संस्था, पोलीस पाटील तसेच नागरिकांच्या मदतीने वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशन यांनी आज शनिवार दि. २४ सप्टेंबर २०२२ रोजी आयोजित केले आहे. 
              शिबिराचे उदघाटन सोमेश्वर कारखान्याचे संचालक अभिजित काकडे व काकडे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ देविदास वायदंडे यांच्या हस्ते  पार पडले. यावेळी आजी माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब शेंडकर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुका महिला सरचिटणीस सुचेता साळवे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक योगेश शेलार, नितीन शेंडकर, शिवाजी शेंडकर, पो ह दीपक वारुळे, पो ह रमेश नागतीलक, पो. ना अमोल भोसले, पो शी महादेव साळुंखे, पो ह अनिल खेडकर, स्वप्नील काकडे आदी मान्यवर उपस्थित होते. 
          हे रक्तदान शिबीर वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन, करंजेपूल दुरक्षेत्र, माऊली मंगल कार्यालय सुपा, सिद्धिविनायक मंगल कार्यालय मोरगाव व शिरष्णे येथे सकाळी ९ ते ५ पर्यंत पार पडणार आहे.
       या भव्य रक्तदान शिबिरात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवावा असे आवाहन वडगांव निंबाळकर पोलीस स्टेशनचे सपोनि सोमनाथ लांडे यांनी केले आहे.
To Top