'सोमेश्वर'च्या सभासदांना एक नंबर दर्जाची साखर मिळावी ! किमान महिला सभासदांचा तरी विचार करा : मदन काकडे

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने कारखान्याचा मालक असलेल्या सभासदांना एक नंबर दर्जा असलेली साखर मिळावी अशी मागणी शेतकरी कृती समितीचे जिल्हा सरचिटणीस मदन काकडे यांनी केली आहे. 
            याबाबत काकडे 'सोमेश्वर रिपोर्टर'शी बोलत होते. ते पुढे म्हणाले, सोमेश्वर चा सभासद हा कारखान्याचा मालक आहे. त्यालाच दर्जाहीन भिजलेली, पिठी साखर खावी लागत आहे. किमान आपल्या महिला भगिनी ज्या सभासद आहेत त्यांचा तरी विचार करून कारखान्याने सहानुभूती पूर्वक याचा विचार करणे गरजेचे आहे. त्यामुळे विक्रीला एक नंबरची साखर आणि कारखान्याचा मालक असलेल्या सभासदाला तीन नंबरची साखर दिली जाते. अधिकाऱ्यांनी असा दुजाभाव करू नये असे मदन काकडे यांनी म्हणटले आहे.
To Top