सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
वाई : दौलतराव पिसाळ
गणेशोत्सव काळात सुट्टीवर आलेला व्याजवाडी(ता. वाई) येथील विजय सुदाम कुदळे (वय 34, सध्या रा. अमरलक्ष्मी, प्रेरणा सोसायटी, सातारा) या जवानाने सातारा येथे शुक्रवारी दुपारी 4.45 वाजता छताच्या हुकाला गळफास लावून घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली.
ते गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांचे नातेवाईक भानुदास शिवाजी वाघ यांच्या निदर्शनास येताच त्यांनी लगेच जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. कुदळे हे रजा संपवून परत डय़ुटीवर जाणार होते. आयटीबीपीमध्ये सेवेत असलेले विजय कुदळे हे सुट्टीवर आले होते. ते सुट्टी संपवून पुन्हा जाण्याच्या तयारीत होते. पण अचानक पणे त्यांनी शुक्रवारी सायंकाळी 4.45 वाजण्याच्या सुमारास साताऱ्यात
राहात असलेल्या अमरलक्ष्मी येथील प्रेरणा सोसायटी मध्ये छताच्या हुकाला ओमणीच्या साह्याने गळफास लावून घेवून आत्महत्या केली. ते लटकत असल्याची त्याचे साडू भानुदास वाघ यांच्या निदर्शनास आले. त्यांनी लगेच त्यांना खाली उतरवून सातारा येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथील ऊपस्थित डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. या मृत्यूची नोंद सातारा शहर पोलिस ठाण्यात झाली आहे .याचा अधिक तपास महिला पोलिस हवलदार वर्षाराणी शिंदे या करीत आहेत .
त्यांचे शवविच्छेदन केल्यानंतर त्यांचे पार्थिव शनिवारी सकाळी व्याजवाडी येथे नेण्यात आले.या दुःखद घटने मुळे व्याजवाडी गावावर शोककळा पसरली आहे त्यांच्या पश्चात आई, वडील,भाव, पत्नी, दोन मुली असा परिवार आहे. दुपारी त्यांच्या पार्थिवावर शासकीय अधिकार्यांच्या ऊपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामस्थांनी सांगितले.