बारामती ! चोपडज वि. का. सोसायटीची वार्षिक सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न

Admin


सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
चोपडज विविध कार्यकारी सहकारी सोसायटी मर्यादित चोपडज ६३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा विठ्ठल रुक्मिणी मंदिर या ठिकाणी सर्व सभासद संचालक मंडळ ग्रामस्थ खेळीमेळी मध्ये पार पडली. 
           सभेचे अध्यक्ष स्थानी  सोसायटीचे चेअरमन गणेश सूर्यकांत गाडेकर होते चोपडज सोसायटीचे कार्यालय पहिल्यांदाच गावामध्ये सुरू करण्यात आले सभासदांची होणारी गैरसोय संचालक मंडळांनी जाणून सोसायटीचे कार्यालय चोपडज या ठिकाणी सुरू करण्यात आले त्याचप्रमाणे पाच महिन्यांमध्ये सोसायटीची सहा लाख रुपयांची थकबाकी वसूल करण्यात आली बारा सभासद नवीन पीक कर्ज वाटप करण्यात आले मयत सभासदांच्या वारसांना नवीन सभासद करून घेण्याचा ठराव मंजूर करण्यात आला यावेळी नवीन संचालक मंडळाचे सर्व सभासदांकडून ग्रामस्थांकडून कौतुक करण्यात आले. 
           यावेळी सागर गायकवाड, सचिन गाडेकर, समीर गाडेकर, राहुल गाडेकर यांनी मनोगते व्यक्त केली. सभेचे अध्यक्ष चेअरमन गणेश गाडेकर यांनी सभासदांच्या प्रश्नांना उत्तरे दिली त्यांच्या भाषणांमध्ये त्यांनी सर्व सभासदांचे आभार मानले पाच महिन्यांमध्ये संस्थेने केलेल्या कर्ज वाटप आणि प्रगतीचा आढावा सभासदांना ग्रामस्थांना सांगितला संस्थेचे सचिव विजय प्रभुणे यांनी बाबासाहेब समोर वार्षिक अहवाल वाचून दाखविला सर्व विषय सर्वानुमते मंजूर करण्यात आले आभार संतोष गाडेकर यांनी मानले, कार्यक्रमाच्या ठिकाणी दीडशे ते दोनशे ग्रामस्थ व सभासद उपस्थित होते संस्थेच्या आर्थिक उत्पन्न वाढीसाठी कर्जदार सभासदांकडून थकबाकी वसुली करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील अशा प्रकारचे आश्वासन सर्व सभासदांना ग्रामस्थांना संचालक मंडळाकडून देण्यात आले कार्यक्रमाच्या सुरुवातीला मयत सभासदांना श्रद्धांजली वाहण्यात आली, त्यानंतर चेअरमन व्हाईस चेअरमन सर्व संचालक मंडळ सभासद यांच्याकडून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कैलासवासी जयसिंग अण्णा गाडेकर, हनुमंत भिकाजी गाडेकर, किसन केरबा पवार, व्यंकट आबा गाडेकर, हनुमंत नाना राजे निंबाळकर, या सर्व माझी चेअरमन यांच्या फोटोला हार घालून श्रद्धांजली वाहण्यात आली, त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली
To Top