बारामती ! ओबीसींचा आक्रमक चेहरा डॉ.अर्चना पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बारामती:- प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सातारा जिल्हा  महिला आघाडीच्या माजी जिल्हा निरीक्षक डॉ अर्चना पाटील यांचा आज भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते मुंबई येथे पक्ष कार्यालयात भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.
        डॉ अर्चना पाटील यांचे इंदापूर तालुक्यातील लासूर्णे गाव आहे, तसेच इंदापूर तालुक्यातील लासूर्णेचे घराणे हे बडे प्रस्थ मानले जाते, डॉ अर्चना पाटील यांचेअजोबा दिनकरराव पाटील यांचा माजी खासदार शंकरराव पाटील यांच्या विरोधात विधानसभेला थोड्या मताने पराभव झला होता. त्यामुळे त्यांच्या प्रवेशाने हर्षवर्धन पाटील यांना चांगले बळ मिळेल.
           यापूर्वी त्यांनी महादेव जानकर यांच्या रासपचे प्रदेश सचिव म्हणून काम केले आहे. डॉ  पाटील यांनी इंदापूर तालुक्यासह बारामती लोकसभा मतदार संघात ओबीसी समाजाचा आक्रमक  चेहरा म्हणू ओळख आहे, त्या MBBS radiologist आहेत त्यांनी बारामती लोकसभा मतदार संघात अनेक बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर भोर वेल्हा या विधानसभा मतदार संघामध्ये अनेक गावं दौरे केले आहे, मागील दोन वर्षापूर्वी महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी अजित पवार यांनी थेट सातारा जिल्हा निरीक्षक पदी डॉ अर्चना पाटील यांची नियुक्ती केली होती. 
यावेळी डॉ पाटील म्हणाल्या की भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे, ओबीसींना भाजपने न्याय दिला आहे, महाविकास आघाडी सरकारने ओबीसींचे आरक्षण घालवले परंतु भाजपची सत्ता येताच ओबीसींना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे आरक्षण मिळाले.
To Top