सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे तात्कालीन कार्यकारी संचालक शहाजी भगत गौरव समितीची साडे तीन लाख रुपयांची रक्कम वसूल करावी अशी मागणी सभासद पी के जगताप, बाळासाहेब गायकवाड व जोतिराम जाधव यांनी केली.
सोमेश्वररनगर ता बारामती येथील ५८ व्या वार्षिक सभेत येणे रकमावरून तसेच शहजी भगत हे कार्यकारी संचालक असताना सेवानिवृत्त कार्यक्रम गौरव समितीचे साडेतीन लाख रुपये येणे बाकी दिसत असून ती रक्कम कधी वर्ग करणार असा सवाल सभासदांनी केला. यावर अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप म्हणाले भगत यांचे बोनस व पगार दिला नाही ते पेमेंट वर्ग करून घेता येत असतील तर ते आपण वर्ग करणार आहोत.