बारामती ! अखिल भारतीय परिवर्तन मराठी साहित्य परिषदेच्या जिल्हाध्यक्षपदी अश्विनी दीक्षित यांची निवड

Admin
2 minute read
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
बारामती : प्रतिनिधी
अखिल भारतीय परिवर्तन मराठी साहित्य परिषदेच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी अश्विनी सुभाष दीक्षित यांची निवड करण्यात आली.
          साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदकुमार शेंडे यांनी एका पत्रकाद्वारे दीक्षित यांची नियुक्ती केली आहे. अश्विनी दीक्षित हे गेल्या अनेक वर्षांपासून साहित्य क्षेत्रात साहित्य संघटनेत सक्रियपणे काम करीत आहेत. त्यांनी विविध पदांवर राहून साहित्य विश्वात आपला आगळावेगळा ठसा उमटविला आहे. विशेष करून त्यांनी विविध राज्यस्तरीय काव्य स्पर्धेत वक्तृत्व स्पर्धेत ठसा उमटवला आहे. राज्यस्तरीय कर्तुत्ववानशिक्षक पुरस्काराने देखील त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. साहित्य क्षेत्रात काम करणाऱ्या नवोदित लेखकांच्या साहित्याला व्यासपीठ उपलब्ध व्हावे, याशिवाय डिजिटल माध्यमातून साहित्यिक संमेलन आयोजित करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे दीक्षित यांनी सांगितले.
To Top