सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : प्रतिनिधी
पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक व शिक्षिका संघ तसेच ,पुणे जिल्हा शिक्षक लोकशाही आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने भोर येथे रविवार दि.२ जीवन गौरव व तालुकास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान सोहळा मोठ्या दिमाखात पार पडणार असल्याची माहिती संघटनेकडून देण्यात आली.
भोर शहरातील भोरेश्वर लॉन्स येथे पार पडणाऱ्या पुरस्कार प्रदान सोहळ्यात शिक्षण महर्षी माजी मंत्री अनंतरावजी थोपटे यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.याचवेळी तालुकास्तरीय १५ तर जिल्हास्तरीय ६५ गुणवंत शिक्षकांना पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येणार आहे.भव्य अशा या पुरस्कार सन्मान सोहळ्यासाठी अध्यक्ष म्हणून आमदार संग्राम थोपटे तर मानद सचिवा राजगड ज्ञानपीठ स्वरूपा थोपटे, सहाय्यक उपायुक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद अनिल गुंजाळ, विश्वस्त महाराष्ट्र राज्य टीडीएफ के. एस.ढोमसे, कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य टीडीएफ जी.के थोरात तर भोर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा निर्मला आवारे कार्यक्रमाला प्रमुख म्हणून उपस्थित राहणार आहेत.