वाई ! इंदिरा महिला पतसंस्थेच्या सभासदांना १० टक्के लाभांश

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
वाई : दौलतराव पिसाळ
वाई येथील इंदिरा महिला नागरी सह पतसंस्थेची ३३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा चेअरमन सौ अंजली पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.सभेस संबोधीत  करताना चेअरमन म्हणाले , संस्थेने २०२१-२२ या आर्थिक वर्षात संस्थेच्या प्रशासकीय व दैनंदिन खर्चात काटकसर ,थकीत कर्जवसुली साठी राबविलेले कठोर धोरण  यामुळे संस्थेस चांगला नफा प्राप्त झाला. संस्थेस सन २०२२ अखेर संपलेल्या आर्थिकवर्षा करिता लेखापरीक्षण वर्ग " अ" मिळालेला आहे,तरी कार्य क्षेत्रातील सर्व महिलांनी संस्थेचे सभासद होऊन संस्थेच्या विविध कर्ज व ठेव योजनांचा लाभ घेऊन आपल्या व संस्थेच्या प्रगतीस हातभार लावावा असे आवाहन केले.तसेच सभासदांना देण्यात येणाऱ्या लाभांशाचे वाटप दि.१/१०/२०२२ पासून करण्याचे घोषित केले. पतसंस्थेस सातारा जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशन यांचे कडून सहकार चळवळीतील योगदानाबद्दल राज्य सहकारी बँकेचे प्रशासक मा.श्री.विद्याधर अनास्कर व सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन श्री नितिन काका पाटील यांचे हस्ते विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.संस्थेस मिळालेला पुरस्कार व संस्थेच्या चांगल्या कामकाजा बद्द्ल सर्व सभासदांनी समाधान व्यक्त केले.तसेच सभेपुढे संचालकांनी सादर केलेल्या सर्व विषयांना एकमताने मंजुरी दिली.संस्थेचे व्हा.चेरमन मुग्धा वैद्य यांनी आभार मानले.संचालिका सौ भावना गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले,संस्थेचे सचिव श्रीकृष्ण येवले यांनी आर्थिक पत्रकाचे वाचन केले या वेळी संचालिका सुलोचना कोरडे,कमल सपकाळ, नीता पवार,विमल मुळीक, अलका खरात,शोभा रोकडे,वनिता वाडकर तसेच विशेष वसुली अधिकारी जायकर साहेब व संस्थेचे कर्मचारी उपस्थित होते.
To Top