....अखेर 'सोमेश्वर'ची 'ती' दहा गावे जोडली जाणार 'माळेगाव'ला ! सोमेश्वरच्या सभासदांनी घेतला वार्षिक सभेत निर्णय

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या सोमेश्वर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील दहा गावे माळेगाव कारखान्याला जोडणार का याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले होते. दिवसभर चाललेल्या वार्षिक सभेत रात्री पावणे अकरा वाजता गावे जोडण्याबाबत मजुरी देत या विषयावर शिक्कामोर्तब केले. 
            आज सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची ५८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. यामध्ये दहा गावे माळेगाव कारखान्याला जोडण्याचा कळीचा मुद्दा होता. यावर सभासदांनी तब्बल पावणेदोन तास चर्चा केली. यामध्ये अंजनगाव, जळगाव कप, जळगाव सुपे, देऊळगाव, कारखेल, भिलारवाडी, नारोळी, कोरोळी, कऱ्हाटी, खराडेवाडी या गावातील बहुतांश  सभासदांनी आम्हाला माळेगावच सोयीस्कर असा सूर लावला तर शेतकरी कृती समितीसह अनेक सभासदांनी याला विरोधही दर्शविला
            यावेळी दिलीप परकाळे, अनिल जगताप, सुरेश वळकुंडे, दिलीप पवार, बी के जाधव, संजय पोमन या सभासदांनी आपली मते व्यक्त केली. 
            यावेळी बोलताना अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप म्हणाले, सोमेश्वर कारखान्याकडे स्थापनेपासून जोडलेली दहा गावे माळेगाव कारखान्याने मागितली आहेत. यातील अनेक सभासदांनी आम्हाला माळेगावला जोडा तर काही सभासदांनी आम्हला सोमेश्वरकडेच राहूनद्या अशी मागणी केली आहे. असे सभासदांचे अर्ज कारखान्याकडे आलेले आहेत. वरील गावांना ऊस वाहतूक अथवा इतर घेवाण देवाण या दृष्टीने माळेगाव कारखाना सोयीस्कर असून सोमेश्वर पेक्षा अंतर ही कमी 
असल्याचे अध्यक्ष पुरूषोत्तम जगताप सांगितले. 
         जळगाव सुपे गावाने माळेगाव कारखान्यालाला आम्हाला जोडावे असे सांगताच सभागृहात काही काळ तणाव निर्माण झाला. परिस्थिती निवळल्यानंतर शेतकरी कृती समितीचे नेते सतिश काकडे म्हणाले की, सोमेश्वर च्या आधी माळेगाव कारखाना उभा राहिला आहे. तेंव्हा माळेगावने या गावांना का जोडून घेतले नाही.आताच का पुळका आला आहे. आदेश आला की संचालकांनी अजेंठयावर विषय घेतला. तुम्हाला उसासाठी नाही तर सव्वाशे मतांचा फरक पडतोय त्यासाठी जोडलं जात आहे. दोन्ही पैकी एकतरी कारखाना विरोधात असला तरच सभासदांचे कल्याण होणार. अस्तरीकणाचा घाट घातला जात आहे. याचा देखील कारखान्यावर परिणाम होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
To Top