'सोमेश्वर'च्या सभासदांना शेअर्सच्या पटीत मिळणार साखर ! वार्षिक सभेने घेतला महत्वपूर्ण निर्णय

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या ५८ व्या वार्षिक सभेत सभासादांना मिळणाऱ्या साखरेबाबत वार्षिक सर्वसाधारण सभेत महत्वपूर्ण ठराव केला असून आता येथून पुढे प्रत्येक शेअर्सला सभासदांना पाच किलो साखर मिळणार आहे. 
             पूर्वी सोमेश्वर कारखान्याचा दहा हजाराचा एक शेयर्स होता. आता त्यामध्ये वाढ करून १५ हजार रुपयांचा एक शेयर्स करण्यात आला. याबाबत काल वार्षिक सभेत विषय मंजूर करण्यात आला. मात्र एका सभासदांचे १५ हजार शेयर्स असले तरी पाच किलो साखर मिळत होती. आणि तीन शेयर्स असले तरी पाच किलो साखर मिळत होती. याबाबत वाघळवाडीचे सभासद सतीश सकुंडे यांनी एका कार्ड ला पाच किलो साखर देण्यापेक्षा एका शेयर्स ला पाच किलो साखर देण्याची मागणी केली. यावर गुळुंचे येथील सभासद दीपक निगडे यांनी अनुमोदन दिले. या विषयांवर सविस्तर चर्चा होऊन वार्षीक सभेने एका शेयर्स ला पाच किलो साखर देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.
To Top